नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेसचे स्वागत!, कोरोना काळात बंद केलेला थांबा
By सुधीर राणे | Published: August 4, 2023 01:47 PM2023-08-04T13:47:33+5:302023-08-04T13:48:06+5:30
कणकवली: कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद केलेला तुतारी एक्सप्रेसचा थांबा शुक्रवारी पूर्ववत करण्यात आला. केंद्रीय ...
कणकवली: कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद केलेला तुतारी एक्सप्रेसचा थांबा शुक्रवारी पूर्ववत करण्यात आला. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची तत्काळ दखल घेत तुतारी एक्सप्रेसला नांदगाव येथे थांबा मिळाला आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधले होते. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तत्काळ याची दखल घेत हा थांबा पूर्ववत केला आहे. त्यामुळे सर्व प्रवाशानी समाधान व्यक्त केले. तसेच नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती मनोज रावराणे, त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगावचे सर्व पदाधिकारी, चालक, मालक, संतोष रावराणे, अजय रावराणे, प्रविण पन्हाळकर, मनाली गुरव, भाई मोरजकर, अनुजा रावराणे, सुनील लाड, छोटू पारकर तसेच दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.