वेंगुर्लेत ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’चे स्वागत
By admin | Published: February 11, 2016 09:35 PM2016-02-11T21:35:27+5:302016-02-12T00:01:46+5:30
भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यातील पर्यटन
वेंगुर्ले : भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यातील पर्यटन व परस्परविषयक संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आॅस्ट्रेलियाचे माजी मंत्री व उत्तम धावपटू पॅट फार्मर यांंच्या ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’चे वेंगुर्लेत बुधवारी स्वागत करण्यात आले. फार्मर यांचे वेंगुर्लेत आगमन होताच जागृती क्रीडा मंंडळाच्या खेळाडूंनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर फार्मर यांंच्यासमवेत पोलीस अधीक्षक शिंदे, ‘जागृती’चे अध्यक्ष संजय मालवणकर, विभास पवार, युथ संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास गावडे, वेंगुर्ले स्पोर्टस्चे राजन गिरप, लायन्स क्लबचे डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. नामदेव मोरे व ‘जागृती’च्या खेळाडुंनी दौडमध्ये सहभाग घेतला. दाभोली नाक्यावर नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी दौडचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी रामदास कोकरे, सचिन वालावलकर, जयराम वायंगणकर, जयवंत चुडनाईक, नंदन वेंगुर्लेकर, आनंंद बांदेकर, दासा आरोलकर, संजय पाटील, पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत उपस्थित होते.