पाटबंधारे मंत्र्याच्या गृप्त दौ-याचे गृपित काय, दोन दिवस वेंगुर्ल्यात बस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 09:36 PM2018-04-19T21:36:33+5:302018-04-19T21:36:33+5:30

राज्याचे पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांनी मोजक्याच अधिका-यांसोबत दोन दिवसांचा सिंधुदुर्ग दौरा केला.

What is the dignified visit of the Irrigation Minister, the two days in Vengurlat Bastan? | पाटबंधारे मंत्र्याच्या गृप्त दौ-याचे गृपित काय, दोन दिवस वेंगुर्ल्यात बस्तान

पाटबंधारे मंत्र्याच्या गृप्त दौ-याचे गृपित काय, दोन दिवस वेंगुर्ल्यात बस्तान

Next

सावंतवाडी - राज्याचे पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांनी मोजक्याच अधिका-यांसोबत दोन दिवसांचा सिंधुदुर्ग दौरा केला. या दौ-यात त्यांनी आपले बस्तान वेंगुर्लेत बसवले होते. त्यामुळे हा दौरा नेमका कशासाठी याचे गुपित मात्र कुणालाच उलगडले नाही. महाजन मंगळवारी दुपारी गोव्यातून आले आणि बुधवारी रात्री उशिरा गोवामार्गे मुंबईकडे रवाना झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाटबंधारे विभागाचे प्रश्न आहेत. अनेक धरणांची कामे बंद आहेत. तर काही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वर्षानूवर्षे तसेच राहिले आहेत. टाळंबा प्रकल्प तर जिल्ह्यात कळीचा मुद्दा होऊन बसला आहे. मात्र सरकार बरोबर भांडायचे तर मुंबईला जावे लागते म्हणून कोण पुढे येत नाहीत. तिलारीचे धरण झाले असले तरी त्याच्या पाण्याचा फायदा सिंधुदुर्गला कमी आणि गोव्याला जास्त होत आहे. सिंधुदुर्गमधील कालव्यातून जर पाणी सोडायचे झाले तर कालव्यांना भगदाडे पडत असतात त्यामुळे स्थानिक शेतकरी चांगले वैतागले आहेत. तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न ही सुटता सुटेना अशी अवस्था झाली आहे. काही प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटला. उर्वरित प्रकल्पग्रस्त अद्यापही वा-यावर आहेत. त्यांना सरकार आश्वासन देऊन ठेवत आहे.
त्यामुळे युती सरकारची स्थापना होऊन तीन वर्षे उलटली आहेत. पण अद्याप एकदाही पाटबंधारे मंत्री सिंधुदुर्गमध्ये आले नसल्याने येथील प्रश्न तसेच पडून आहेत. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बागायतदार धरणग्रस्त यांना गेले तीन वर्षे पाटबंधारे मंत्र्याची प्रतिक्षा आहे. पण मंत्री महोदय कधी आलेच नाहीत. त्यातच १७ व १८ एप्रिल अशा दोन दिवसांसाठी पाटबंधारे मंत्री नियोजित अशा सिंधुदुर्ग दौºयावर आले होते. त्यांच्या दौ-याला माहिती विभागाने प्रसिद्धीही दिली होती.
पण असे असताना प्रशासनाने त्यांच्या दौ-याची एवढी गुप्तता का ठेवली त्याचे कोडे शेवटपर्यंत उलगडलेच नाही. १७ एप्रिलला पाटबंधारे मंत्री महाजन हे गोव्यातून थेट वेंगुर्ले येथील सागर विश्रामगृहावर दाखल झाले. तेथे त्यांनी दोन दिवस आपले बस्तान बसवले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबही होते. तसेच काही मोजके अधिकारी होते. मात्र दोन दिवसात मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेत आल्याची पुसटशी कल्पनाही कोणाला देण्यात आली नव्हती.
त्यामुळे मंत्री महाजन यांच्या दौ-याला माहिती कार्यालयाने प्रसिद्धी देऊन त्यांचा दौरा मोजक्याच अधिकाºयांच्या पुरता मर्यादित कसा काय ठेवण्यात आला, याबाबत मात्र सिंधुुदुर्गात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: What is the dignified visit of the Irrigation Minister, the two days in Vengurlat Bastan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.