निवडणुका आल्या की टाकाऊ माल अनेकजण विकत घेतात, विनायक राऊत य़ांची मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर टीका
By अनंत खं.जाधव | Published: January 14, 2024 08:58 PM2024-01-14T20:58:27+5:302024-01-14T21:00:56+5:30
Vinayak Raut criticizes Milind Deora: निवडणूका आल्या कि दुकाने टाकाऊ माल खरेदी करायला तयार होतात. ज्या दुकानात स्वताला जास्त किंमत तेथे स्वताला विकायचे यात आचार विचार काय असणार अशा शब्दात शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी काँग्रेस चे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर टिका केली.
- अनंत जाधव
सावंतवाडी - निवडणूका आल्या कि दुकाने टाकाऊ माल खरेदी करायला तयार होतात. ज्या दुकानात स्वताला जास्त किंमत तेथे स्वताला विकायचे यात आचार विचार काय असणार अशा शब्दात शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी काँग्रेस चे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर टिका केली.
ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी दक्षिण मुंबई तून अरविंद सावंत यांचाच विजय निश्चित असल्याचेही ही सांगितले. खासदार राऊत म्हणाले,आचार विचार नसणारे निवडणुका आल्या कि संधी शोधत असतात त्यात काहि नवल नाही.कारण आता अनेक पक्षप्रवेश होतील यातील काहि पक्षप्रवेश हे ईडी सीबीआय यांच्या धाकातून होतील तर काहि जण तिकिटासाठी उड्या मारतील पण हे पक्षप्रवेश निष्ठेने होणार नसून उद्या निवडणूका झाल्या कि ते पुन्हा माघारी परतील असा विश्वास ही खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मिलिंद देवरा हे बऱ्याच दिवसांपासून काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी सुरू होती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे ही उमेदवारी मिळावी म्हणून देवरा आले होते.पण पक्षप्रमुख हे अरविंद सावंत यांच्या पाठीशी राहिले होते.त्यामुळेच आज त्यांनी हे पाऊल उचलल्याचे ही राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अतुल रावराणे शैलेश परब,रूपेश राऊळ,रमेश गावकर,अशोक परब, बाळा गावडे,मंदार शिरसाट चंद्रकांत कासार आदि उपस्थित होते.