नोटा ठेवायच्या कोठे, रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बँकांना पडला प्रश्न ?
By admin | Published: November 12, 2016 09:37 PM2016-11-12T21:37:55+5:302016-11-12T21:37:55+5:30
पाचशे आणि एक हजार रूपयांच्या सध्याच्या नोटा आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागलेली लोकांची रीघ तिस-या दिवशीही कायम होती.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. १२ - पाचशे आणि एक हजार रूपयांच्या सध्याच्या नोटा आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागलेली लोकांची रीघ तिस-या दिवशीही कायम होती. तीन दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बँकांमध्ये पाचशे आणि एक हजार रूपयाच्या जवळपास एक हजार कोटी नोटा जमा झाल्या आहेत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत पाठवल्या जाणार असल्या तरी तोपर्यंत त्या ठेवायच्या कोठे, असा प्रश्न बँकांसमोर उभा राहिला आहे.
पाचशे आणि एक हजार रूपयाच्या सध्याच्या नोटा मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून चलनातून बाद झाल्या. बुधवारी बँका बंद होत्या. गुरूवारी सकाळपासून राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांसमोरील रांगा सुरू झाल्या. ही गर्दी होणार, हे लक्षात घेऊनच एरवी तीन किंवा साडेतीन वाजता बंद होणारा देवघेव व्यवहार सायंकाळी साडेपाच, सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला. मात्र सलग तिसºया दिवशीही बँकांमधील गर्दी कायम होती.
आजवर बँकांमध्ये होणारी गर्दी ही बºयाचदा पैसे काढण्यासाठीच झाली आहे. यावेळी मात्र बँकेतून पैसे काढणाºयांपेक्षा किंवा पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्याºयांपेक्षा बँकेत पैसे ठेवणाºयांची संख्या चौपट आहे. या नोटा आपल्या खात्यात जमा करण्याचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे बँकांकडील अशा नोटांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मिळून तीन दिवसात पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटांचे अंदाजे एक हजार कोटी रूपये बँकांकडे जमा झाले आहेत.
आजच्या घडीला या नोटांचे बाजारमूल्य शून्य झाले आहे. मात्र जोपर्यंत या नोटा रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात दिल्या जात नाहीत, तोपर्यंत ती महत्त्वपूर्ण मालमत्ता आहे. त्यामुळे त्या स्ट्राँगरूममध्येच ठेवणे अनिवार्य आहे. लोकांना वितरित करण्यासाठी, एटीएममध्ये भरण्यासाठी म्हणून १00 रूपयांच्या तसेच ५0, २0 आणि १0 रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध झाल्या आहेत. काही प्रमाणात दोन हजार रूपयांच्या नोटाही जिल्ह्यात आल्या आहेत. नव्याने येणाºया किंवा चलनात असलेल्या नोटांंचा ‘स्टॉक’ ठेवण्यासाठी बँकांना जागेची गरज असताना चलनातून बाद झालेल्या नोटांची सातत्याने भर पडत आहे.
या नोटा रिझर्व्ह बँकेकडून परत नेल्या जाणार आहेत. मात्र देशभरात नव्या नोटांचे तसेच चलनातील इतर नोटांचे वितरण करण्याचे रिझर्व्ह बँकेचे काम वाढलेले असल्याने जुन्या नोटा परत जाण्याला अजून कालावधी लागू शकतो, अशी माहिती पुढे येत आहे. मात्र तोपर्यंत आधीच मर्यादीत असलेल्या जागांमध्ये या नोटा ठेवायच्या कशा, सांभाळायच्या कशा असा प्रश्न बँकांसमोर उभा राहिला आहे.
पैसे काढण्यापेक्षा पैसे खात्यात भरणाºयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खूप मोठी रक्कम बँकांकडे जमा होत आहे. सर्वच बँकांमधील अधिकारी, कर्मचारी उशिरापर्यंत थांबून खातेदारांना अधिकाधिक सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनपर्यंत मर्यादीत नव्या नोटा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र चलनात असलेल्या इतर नोटा खातेदारांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या बँकेची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६पैकी ७0 एटीएम सेंटर्स सुरू झाली आहेत. ती तशीच सुरू ठेवण्यावर आमचा भर असेल.
- सतीश भाटीया सहाय्यक महाव्यवस्थापक भारतीय स्टेट बँक, रत्नागिरी