बालपणीचा प्रवास उलगडताना डॉ.माशेलकर झाले भावनिक, आठवणींना दिला उजाळा

By अनंत खं.जाधव | Published: December 20, 2023 04:30 PM2023-12-20T16:30:34+5:302023-12-20T16:32:27+5:30

सावंतवाडी : एखादा माणूस मोठा होतो पण तो कधी आपले बालपण विसरत नाही म्हणतात ना ते खोटे नाही, याचाच प्रत्यय ...

while unfolding his childhood journey Scientist Dr. Raghunath Mashelkar became emotional | बालपणीचा प्रवास उलगडताना डॉ.माशेलकर झाले भावनिक, आठवणींना दिला उजाळा

बालपणीचा प्रवास उलगडताना डॉ.माशेलकर झाले भावनिक, आठवणींना दिला उजाळा

सावंतवाडी : एखादा माणूस मोठा होतो पण तो कधी आपले बालपण विसरत नाही म्हणतात ना ते खोटे नाही, याचाच प्रत्यय थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आला. समोरच्या विद्यार्थ्याचे बालपण बघून डॉ.माशेलकर यांनाही आपले बालपण आठवले आणि त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत आपले बालपण विद्यार्थ्यांसमोर उलगडले.

आठवणींना उजाळा देताना आपल्या घरची हालखीची परिस्थिती,  दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत अनवाणी चालावं लागलं असे सांगत डॉ.माशेलकर भावनिक झाले. मात्र स्वत:ला सावरत आपल्या आईने परिस्थिती समोर हात न टेकता जिद्द सोडली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आईने सांगितले विज्ञानाचा वापर गरिबांसाठी कर. वाचनाचा सल्ला दिला तसेच विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे असेही ते म्हणाले.

जातीपातीच्या भिंती तोडून एकत्र यायला हवं

तंत्रज्ञानाच्या युगात आताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त वाचावं अस आवाहनही केलं. आपण कुठं जन्मलो याला महत्त्व नाही. श्रीमंत शिक्षण मिळाले तर आपले विचारही श्रीमंत होतात. त्यामुळे शालेय शिक्षण खूप महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या भिंती तोडून आपण एकत्र  यायला हवं. आपण आपल्यातील संवाद हरवत चाललो आहोत. संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात. वाद टाळता येऊ शकतात असेही ते म्हणाले. 

हळदीच्या पेटंटसाठी अमेरिकेच्या विरोधात दिलेला लढा, बसुमाती तांदळाच्या पेटंटच्या बाबतीतले अनेक किस्से, विविध परिषदा, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि कौटुंबिक घटना याबाबतीतले अनेक किस्से त्यांनी सांगितले. माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी डॉ.माशेलकर यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, चेअरमन अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापकिय समन्वयक  सुनेत्रा फाटक, प्राचार्य डॉ. विजय जगताप, प्राचार्य डॉ. रमण बाणे,उपप्राचार्य गजानन भोसले, प्राचार्य सत्यजित साठे उपस्थित होते.

Web Title: while unfolding his childhood journey Scientist Dr. Raghunath Mashelkar became emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.