कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांनी आंदोलन का केले? मात्र गैरसोय होऊ दिली नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:02 PM2020-05-04T13:02:20+5:302020-05-04T13:04:59+5:30
शनिवारी कणकवली येथे झालेल्या या आंदोलनामध्ये डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग (डी. एफ.सी.), इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, सर्जन असोसिएशन आॅफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश होता.
कणकवली : फेसबुकवर डॉ. विवेक रेडकर आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांबद्दल बदनामीकारक व चिथावणीखोर पोस्ट टाकणा-या प्रवृत्तीचा सिंधुदुर्गातील डॉक्टरांनी काळी फीत लावून शनिवारी निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला कणकवलीसह जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
शनिवारी कणकवली येथे झालेल्या या आंदोलनामध्ये डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग (डी. एफ.सी.), इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, सर्जन असोसिएशन आॅफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश होता.
रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू ठेवण्यात आली होती.अशा समाजातील प्रवृत्तीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. आंदोलन १०० टक्के यशस्वी केल्याबद्दल जिल्ह्यातील डॉक्टरांचे आभार डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी मानले.
कारवाई करावी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी देणाºया प्रवृत्तीबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशा प्रवृत्तीचा प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त करावा व कायद्याच्या माध्यमातून शिक्षा द्यावी. ह्यत्याह्ण दोषींवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.