Sindhudurg: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला संपविले, पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:23 PM2024-10-16T12:23:58+5:302024-10-16T12:24:19+5:30

मृतदेहाच्या बाजूला होती चिठ्ठी

Wife terminated on suspicion of character in Kudal Sindhudurg district husband absconding | Sindhudurg: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला संपविले, पती फरार

Sindhudurg: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला संपविले, पती फरार

कुडाळ : पत्नीला चारित्र्यावरून संशय घेत ओमप्रकाश बंधन सिंह (५२) याने त्याची पत्नी रेणुका सिंह (४२) हिला ठार मारुन तो फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी कुडाळपोलिसांनी पथक रवाना केले असून मुंबई रेल्वे पोलिसांची मदत घेतली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

नेरूर कविलगाव येथे ओमप्रकाश सिंह हे त्यांची पत्नी रेणुका सिंह, तीन मुली व एक मुलगा असे कुटुंबासह राहतात. ओमप्रकाश सिंह हा सेंट्रिंगची कामे घेतो. मार्च २०२४ मध्ये त्याला भडगाव येथील सेंट्रिंगचे काम मिळाले. त्यामुळे काही दिवस कविलगाव आणि काही दिवस भडगाव येथे पती-पत्नी राहत होते.

दरम्यान, या घटनेबाबत त्यांची मुलगी रिया ओमप्रकाश सिंह हिने कुडाळ पोलिसांना माहिती दिली. आई व वडील यांच्यामध्ये सातत्याने भांडण होत होती. वडील आईवर चारित्र्यावरून संशय घेत होते. आणि ही भांडण होत असताना हिला कधीतरी मी ठार मारून कोठडीत जाईन, असे बोलत असत.

१३ ऑक्टोबर रोजी वडील ओमप्रकाश यांनी आई रेणुका हिला भडगाव येथे बोलवले. त्याच दिवशी संध्याकाळी रिया तिचे बोलणे आईसोबत झाले होते. १४ ऑक्टोबर रोजी रिया हिने आईला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र हा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. अखेर रियाने १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आपल्या मैत्रिणी सोबत भडगाव धनगरवाडी येथे आई राहत असलेल्या घरी गेली. त्या ठिकाणी घराला कुलूप दिसले म्हणून ती व मैत्रीण पुन्हा कुडाळ येथे आले.

दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी रिया हिचे वडील ओमप्रकाश याने पहाटे ४:४८ वाजता भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आपल्या पत्नीला ठार मारल्याचे सांगितले. आणि चावी चुलीमध्ये आहे. ती घेऊन दरवाजा उघडा तिचे साहित्य बाजूलाच आहे, असे सांगितले. त्यानंतर रिया हिने आपल्या नातेवाइकांना दूरध्वनी वरून पोलिस ठाण्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर रेणुका उर्फ रेश्मा या मृतावस्थेत आढळून आल्या. आपल्या पत्नीला ठार मारून ओमप्रकाश सिंह याने पळ काढला होता.

मृतदेहाच्या बाजूला होती चिठ्ठी

ओमप्रकाश सिंह याने मृतदेहाच्या बाजूला लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे की, पत्नीने मला धोका दिलेला सहन झाला नाही तिला अनेकवेळा परपुरुषाबरोबर फिरताना मी पाहिले. तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मला सोडण्याचा विचार करत होती आणि हे मला मान्य नव्हते म्हणून मी तिला ठार मारले. ही चिठ्ठी ओमप्रकाश सिंह यांच्या हस्ताक्षरात असल्याचे तिची मुली रिया सिंह हिने सांगितले.

पथक मुंबईला रवाना

ओमप्रकाशने आपल्या पत्नीला ठार मारून पळ काढला असून पोलिसांनी मोबाइल लोकेशनद्वारे माहिती घेतली असता ओमप्रकाश हा मुंबई दादर येथे असल्याचे समजून आले. कुडाळ पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक कऱ्हाडकर, पोलिस कर्मचारी माळगावकर, मुंडे या पथकाला मुंबई येथे रवाना केले असून रेल्वे पोलिसांची मदत घेतली आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.

वीस वर्षापासून हे कुटुंब सिंधुदुर्गात

ओमप्रकाश सिंह झारखंड येथील मूळ रहिवासी आहे. तर त्याची पत्नी रेणुका ही मूळची कर्नाटक राज्यातील. त्यांनी विवाह केला. त्यानंतर हे कुटुंबीय कुडाळ येथे राहण्यास होते. गेली वीस वर्ष हे कुटुंब या ठिकाणी राहत आहे. ओमप्रकाश हा सेंट्रिंगची काम करत असे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मगदूम यांनी दिली.

Web Title: Wife terminated on suspicion of character in Kudal Sindhudurg district husband absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.