ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 03:13 PM2021-05-05T15:13:55+5:302021-05-05T15:16:42+5:30

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी तातडीने चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आढावा बैठकीदरम्यान स्पष्ट केले.

Will discuss with the District Collector about the supply of oxygen | ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

कणकवली उपजिल्हा रुग्णालय व शिरवल येथील कोविड केअर सेंटरची पाहणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकार प्रजित नायर यांनी केली.

Next
ठळक मुद्देऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार : प्रजित नायर कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घेतला आढावा

कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी तातडीने चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आढावा बैठकीदरम्यान स्पष्ट केले.

नायर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय व शिरवल येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून कोविड रुग्णांच्या सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत रुग्णांना देण्यात येणारी सेवा व कमी पडत असलेल्या बाबींवर चर्चा केली. तसेच रुग्ण सेवेबाबत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी अभिजित हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे उपस्थित होते.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी सेंटरमधील बेडला पुरेसा ऑक्सिजन आहे का? याबाबत आढावा घेतला. त्यावेळी आरोग्य विभागाकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसीमध्ये एकूण १० बेड असून, त्यातील ६ बेड हे ऑक्सिजनचे व ४ बेड व्हेंटिलेटरचे आहेत.

मात्र, व्हेंटिलेटरचा वापर हा अतिगंभीर रुग्णांसाठी होतो. त्यामुळे ऑक्सिजनचे बेड व पुरवठा वाढविण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले. त्यावर नायर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याशी चर्चा करून पुरेसा ऑक्सिजनसाठा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला देण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही सांगितले.

यावेळी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही नायर यांनी आढावा घेतला. लसीकरण सेंटरबाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरची नायर व अधिकाऱ्यांनी पाहणी करून तेथील कोरोनाच्या रुग्ण सुविधेबाबत आढावा घेतला.

 

Web Title: Will discuss with the District Collector about the supply of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.