विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढणार

By admin | Published: October 6, 2015 09:53 PM2015-10-06T21:53:40+5:302015-10-06T23:39:27+5:30

नीलेश राणे : निवडणूक तयारीचा घेतला आढावा

Will fight elections on development issues | विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढणार

विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढणार

Next

मंडणगड : मंडणगड शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन काँग्रेस नगरपंचायत निवडणुका लढणार असल्याचे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी केले़ प्रदेश काँग्रेस पार्टीच्या नगरपंचायत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंडणगड दौऱ्यावर ते आले होते़ येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची निवडणुकीसंदर्भातील भूमिका मांडताना राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आघाडी व्हावी यासाठी दोन्ही बाजूंकडून सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे स्पष्ट केले. पण याचबरोबर आघाडी न झाल्यास पूर्ण १७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचेही सांगितले.
यावेळी त्यांनी आघाडी करताना मित्रपक्षाबरोबरील सन्मानपूर्वक जागा वाटपातील तोडग्यानंतर आघाडीची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. काँग्रेसने आतापर्यंत मंडणगडच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत आणि भविष्यातही प्रयत्न करणार आहे. हा मुद्दा घेऊनच ही निवडणूक लढवली जाईल, असे नीलेश राणे म्हणाले.कोणावरही टीका न करता शहराचा विकास हाच आपला अजेंडा असणार आहे, त्यासाठी नागरिकांशी जनसंपर्क अधिक असणारेच उमेदवार असणार आहेत. भाजप - सेना युतीस राज्यासह शहरात सध्या अंतर्गत वादामुळे अत्यंत प्रतिकुल वातावरण असल्याने युतीच्या कारभारच्या विरोधात जनतेच्या मनात असलेला राग आगामी निवडणुकांत पूर्ण राज्यात विरोधी मतदानाच्या रुपाने व्यक्त होणार आहे.
यावेळी राणे यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर उमेदवारांशी निवडणुकांसंबधी सविस्तर चर्चा केली़ यावेळी तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, अशोक कोकाटे, तालुका सरचिटणीस संतोष मांढरे, मधुकर दळवी, राजाराम लेंडे, समंद मांडलेकर, प्रबोध कोकाटे, रघुनाथ देवरुखकर, राहूल अनिल कलमकर, राहूल कोकाटे, कादीर बुरोंडकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़. (प्रतिनिधी)


राजकीय हालचालींना वेग
मंडणगड शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी ही नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेना भाजपनेही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. युती आणि आघाडी करण्याकडे चारही पक्षांचा कल आहे. त्यामुळे भविष्यात काय घडणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. इतर पक्षही या पहिल्या निवडणुकीत उतरणार आहेत.

Web Title: Will fight elections on development issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.