राणेंशिवाय जिल्ह्यात ‘त्यांचे’ अस्तित्व नाही
By admin | Published: July 4, 2014 11:00 PM2014-07-04T23:00:51+5:302014-07-05T00:08:13+5:30
राणे, भोगटे, पावसकरांची टीका
कुडाळ : नीतेश राणे हे काँग्रेसचे प्रांतिक सदस्य असून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांनाही आहेत, हे अधिकार पक्षश्रेष्ठींनाच म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. तसेच तेली, कुडाळकर व पडते यांचे राणेंशिवाय जिल्ह्यात कोणतेही अस्तित्व नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे विनायक राणे, सुनील भोगटे व रुपेश पावसकर यांनी सांगितले आहे.
नीतेश राणेंना गावभेट कार्यक्रमावेळी काँग्रेसला संपविण्याचे काम कोण करत आहे. याची जाणीव झाली होती. जिल्ह्यातील बदल करण्याची गरज ओळखूनच त्यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केले. जनतेमध्ये कुडाळकर व पडते यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. राणेंशिवाय यांचे कोणतीही अस्तित्व नसल्याचे लक्षात आल्यानेच राणेंना खूश करण्याचे काम यांनी पोटनिवडणुकीत केले. राणेंमुळेच कुडाळकर व पडते यांना विविध पदे उपभोगता आली. कौलारु घरात राहणाऱ्याकडे बंगले व गाड्या कशा आल्या याचाही विचार करण्यात आला पाहिजे. नीतेश राणेंविरोधात पत्रकबाजी करताना राणेंना दु:ख देतोय याची जाणीव या व्दयींना नव्हती का? राणेंच्या नावाचा वापर करुन धनवान बनलेल्या कुडाळकर व पडते यांनी कृतघ्नपणे पेपरबाजी केली. त्यामुळे कुडाळकर व पडते यांनी जनतेतील आपली पत ओळखावी. नीतेश राणेंनी बोललेले सत्यच आहे. राणेंशिवाय कुडाळकर व पडते यांचे कोणतीही अस्तित्व नसल्याचे सांगत विनायक राणे, सुनिल भोगटे व रुपेश पावसकर या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकबाजीला प्रत्युत्तर दिले आहे. (प्रतिनिधी)