महिलाही कायद्याअंतर्गत दाद मागू शकतात

By admin | Published: September 1, 2015 09:24 PM2015-09-01T21:24:17+5:302015-09-01T21:24:17+5:30

ए. बी. रेडकर : महिला कायदेविषयक शिबिर

Women can also apply for a lawsuit | महिलाही कायद्याअंतर्गत दाद मागू शकतात

महिलाही कायद्याअंतर्गत दाद मागू शकतात

Next


रत्नागिरी : महिलेला तिच्या मुलांना तातडीचे आर्थिक सहाय्य, रहायला निवासाची सोय व कामाच्या ठिकाणी संरक्षण अशा अनेक मदती कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याअंतर्गत दाद मागता येते, असे मार्गदर्शन येथील न्यायालयाचे तिसरे सहदिवाणी न्यायाधीश ए. बी़ रेडकर यांनी केले.
महाराष्ट्र् राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई वार्षिक कार्यक्रमानुसार येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शहरातील गोदुताई जांभेकर विद्यालयात महिला विषयक हक्क, अधिकार, मुलांचे शिक्षणाचा हक्क, मुलगी वाचवा, मुलीला शिकवा या विषयांवर कायदेविषयक शिबिर घेण्यात आले़ यावेळी रेडकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला अ‍ॅड. रूची महाजनी व अ‍ॅड. नीलम शेवडे, तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका गायत्री गुळवणी उपस्थित होत्या.
रेडकर पुढे म्हणाले की, मुलांबरोबर मुलींनाही कायद्यामध्ये तेवढाच हक्क दिला आहे़ तसेच मुलींना मालमत्तेमध्ये समान हक्क दिले गेले आहेत. आपल्या विरूध्द काही अयोग्य अशा घटना घडत असतील तर मुलीही दाद मागू शकतात़ तसेच आपल्याला आपले संरक्षणही करता आले पाहिजे़ त्यासाठी मुलींनी सक्षम होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वागत आणि प्रस्तावना गायत्री गुळवणी यांनी केले़ अ‍ॅड. रूची महाजनी यांनी मुलींची जडणघडण हे त्यांच्या आई - वडिलांवरच अवलंबून आहे़ मुलींना जन्माला येण्याच्या आणि जन्मल्यानंतर मुलांएवढाच जगण्याचा हक्क आहे़ तो हक्क मिळावा, यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक आहे.़ मुलगी वाचवा व मुलीला शिकवा ही पंतप्रधानांनी जाहीर केलेली योजना आहे, त्यासाठी समाज जागृती करता येईल तेवढी तुम्ही करावयाची आहे, असे त्यांनी शिबिरार्थींना सांगितले.
मुलींना मार्गदर्शन करताना सांगितले की, गाडीमध्ये कोणी मुले धक्काबुक्की करत असतील तर आपल्याला त्याला रोखता आले पाहिजे किंवा त्याच्या विरूध्द पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करता आली पाहिजे, असे अ‍ॅड. शेवडे यांनी सांगितले. व्हॉटसप, फेसबुक यासह इतर नेटवर्किंग साईटमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे़
नेटवर्किंग साईटवर अश्लील छायाचित्र किंवा अश्लील संदेश कोणी पाठवत असेल तर त्याच्याविरूध्द आपण तक्रार करू शकता. घरात लग्नानंतर नवऱ्याकडून नवऱ्याच्या नातेवाईकांकडून अत्याचार होत असल्यास त्याविरूध्द न्यायालयात दाद मागता येते, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र भाटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Women can also apply for a lawsuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.