महिला सरपंचास लाच घेताना अटक
By admin | Published: June 9, 2015 11:19 PM2015-06-09T23:19:44+5:302015-06-10T00:34:27+5:30
वेताळबांबर्डेतील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कुडाळ : स्मशानभूमीच्या बांधकामाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी तीन हजारांची लाच ठेकेदाराकडून घेताना वेताळबांबर्डेच्या महिला सरपंच रोहिणी राजन चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचून रंगेहात पकडले. वेताळबांबर्डे गडकरीवाडी येथील स्मशानभूमीच्या बांधकामाचे काम तेथीलच गावातील गोविंद यादव या ठेकेदाराने घेतले. हे बांधकाम १ लाख ८९ हजार ३२८ रुपये इतक्या रकमेचे होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे बिल पाच टक्केप्रमाणे अदा केले पाहिजे होते. या बिलाचा एक धनादेश यादव यांना यापूर्वी मिळाला होता. आता फक्त १७ हजार ३८८ रुपयांचा धनादेश वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीकडून येणे बाकी होता. हा धनादेश लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी ठेकेदाराने सरपंच चव्हाण यांच्याकडे केली असता त्यांनी धनादेश देण्याकरिता तीन हजार रुपये देण्याची मागणी केली.
यानंतर ठेकेदार यादव यांनी वेताळबांबर्डेच्या सरपंच तीन हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात ३ जून रोजी केली. यादव यांनी केलेल्या तक्र ारीची छाननी करण्यासाठी ५ जून रोजी सरपंच चव्हाण यांचे फोन टॅप करण्यात आले. यावेळी त्यांनी तीन हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ६ जून रोजी लाच घेताना रंगेहात पकडण्यासाठी वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीकडे सापळा रचण्यात आला. मात्र, सरपंच चव्हाण ग्रामपंचायतीत आल्या आणि फक्त तीन मिनिटांत निघून गेल्याने त्यांना त्यादिवशी पकडता आले नाही. ७ रोजी ग्रामपंचायत बंद, तर ८ जून रोजी सरपंच नसल्याने सापळा रचता आला नव्हता.
गेले सहा ते सात दिवस लाचलुचपत विभागाचे अधिकारी चव्हाण यांना पकडण्यासाठी योग्य वेळ शोधत होते. अखेर ९ जून रोजी लाचलुचपतने वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीच्या बाहेर सापळा रचत ठेकेदार यादव यांना सरपंच चव्हाण यांना पैसे देण्यासाठी पाठविले व तीन हजार रुपयांची लाच घेताना चव्हाण यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाण्याचे अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मुकुं द हातोटे, पोलीस निरीक्षक अनिल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. डी. राणे, पोलीस हवालदार बुधाजी कोरगावकर, मकसूद पिरजादे, साक्षी पवार, कर्मचारी नीलेश परब, सुनील देवळेकर, आशिष जामदार, महेश जळवी यांनी केली. (प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधीवरील पहिलीच कारवाई
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रतिनिधीला लाच घेताना रंगेहात पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. लाच घेताना पकडण्यात आलेल्या सरपंच चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बुधवारी ओरोस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
स्मशानभूमीला त्यांनीच जमीन दिली
खरे तर ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, ती जमीन सरपंच चव्हाण यांच्याच कुटुंबीयांनी दिली असून, त्यांना खोट्या राजकारणात अडकविल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
महिला सरपंचास लाच घेताना अटक
वेताळबांबर्डेतील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कुडाळ : स्मशानभूमीच्या बांधकामाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी तीन हजारांची लाच ठेकेदाराकडून घेताना वेताळबांबर्डेच्या महिला सरपंच रोहिणी राजन चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचून रंगेहात पकडले.
वेताळबांबर्डे गडकरीवाडी येथील स्मशानभूमीच्या बांधकामाचे काम तेथीलच गावातील गोविंद यादव या ठेकेदाराने घेतले. हे बांधकाम १ लाख ८९ हजार ३२८ रुपये इतक्या रकमेचे होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे बिल पाच टक्केप्रमाणे अदा केले पाहिजे होते. या बिलाचा एक धनादेश यादव यांना यापूर्वी मिळाला होता. आता फक्त १७ हजार ३८८ रुपयांचा धनादेश वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीकडून येणे बाकी होता.
हा धनादेश लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी ठेकेदाराने सरपंच चव्हाण यांच्याकडे केली असता त्यांनी धनादेश देण्याकरिता तीन हजार रुपये देण्याची मागणी केली.