महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील राहणार : लिओ वराडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:40 PM2020-01-01T20:40:32+5:302020-01-01T20:42:17+5:30

दरम्यान, पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाहून डॉ. वराडकर यांनी ‘ओह, ही इज शिवसेना लीडर’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याने बाळासाहेबांचे कार्य सर्वदूर असल्याचे स्पष्ट झाले.

Women will strive for empowerment | महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील राहणार : लिओ वराडकर

मालवण नगरपालिकेत आयरिश पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

Next
ठळक मुद्देआयर्लंडच्या पंतप्रधानांची मालवण नगरपालिका, टोपीवाला हायस्कूलला सदिच्छा भेट

मालवण : महिलांना राजकीय व्यासपीठ मिळायला पाहिजे. आयर्लंडच्या संसदेत २५ टक्के महिला प्रतिनिधीत्व करतात. मात्र, भारतात महिलांना समान संधी देताना महिलांसाठी ५० टक्के आरक्षण राखीव ठेवले गेले आहे. महिला सबलीकरणासाठी ‘महिलाराज’ हे महत्त्वपूर्ण पाऊल असून आयर्लंडमध्येही या तत्त्वाचा गांभीर्याने विचार करून महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जाईल, असा आशावाद आयर्लंडचे तरुण पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी व्यक्त केला. 

 

दरम्यान, पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाहून डॉ. वराडकर यांनी ‘ओह, ही इज शिवसेना लीडर’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याने बाळासाहेबांचे कार्य सर्वदूर असल्याचे स्पष्ट झाले.

मालवण तालुक्यातील वराड  या आपल्या मूळगावी आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर हे दोन दिवसांच्या खासगी दौºयावर आले होते. सोमवारी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलला त्यांनी भेट दिली. लिओ यांचे वडील डॉ. अशोक वराडकर हे टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असल्याने लिओ यांनी वडिलांसमवेत या शाळेला भेट देत पाहणी केली. यावेळी डॉ. अशोक वराडकर यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.  पंतप्रधान वराडकर यांनी मालवण नगरपालिकेलाही भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर व नगरसेवक नितीन वाळके यांनी लिओ यांना शतक महोत्सव साजºया केलेल्या मालवण नगरपरिषदेविषयी व मालवण शहर, पर्यटन याबाबत माहिती दिली. 

चौकट

विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद

प्रशालेचे मुख्याध्यापक मिलिंद अवसरे, दिगंबर सामंत यांच्यासह नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी लिओ व डॉ. प्रकाश वराडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विजय कामत, लक्ष्मीकांत खोबरेकर, नगरसेवक नितीन वाळके, तपस्वी मयेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी लिओ यांचे स्वागत केले. यावेळी लिओ वराडकर यांनी वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरियम, बहिणी सोफिया व सोनिया यांच्यासमवेत टोपीवाला हायस्कूलची पाहणी करीत वर्गखोल्या, चित्रकला हॉल, डिजिटल रूमला भेट दिली. यावेळी लिओ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

 

Web Title: Women will strive for empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.