सिंधुदुर्ग : कणकवलीतील चौपदरीकरणाचे काम सर्व सम्मतीनेच : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:06 PM2018-10-24T12:06:23+5:302018-10-24T12:11:13+5:30

प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली.

The work of four-laning of Kankavali is done by all the consent: Nitesh Rane | सिंधुदुर्ग : कणकवलीतील चौपदरीकरणाचे काम सर्व सम्मतीनेच : नितेश राणे

कणकवली शासकीय विश्रामगृह येथे प्रकल्पग्रस्तांशी आ़मदार नितेश राणे़ यांनी संवाद साधला. यावेळी उदय वरवडेकर, अनिल शेटये, बाळा बांदेकर, सुशिल पारकर, माधव शिरसाट आदी़ उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकणकवलीतील चौपदरीकरणाचे काम सर्व सम्मतीनेच : नितेश राणेकणकवली प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यांवर यशस्वी तोडगा भाजी, विक्रेते, स्टॉल धारकांचे होणार पुर्नवसन

कणकवली : कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी लढा सुरू होता़. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज स्वरूपात मदत द्यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार आ़मदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ़. दिलीप पांढरपट्टे यांच्या दालनात यशस्वी बैठक झाली आहे.

येत्या दोन दिवसात महत्वपूर्ण बैठक होऊन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला व भाडेकरूंना मोबदला देण्यात येईल.निवाडा धारकांच्या खात्यावर मोबदला जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती अ‍ॅड़ उमेश सावंत यांनी दिली़. तर प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आ़मदार नितेश राणे यांच्या उपस्थिती प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली़ . यावेळी अ‍ॅड़ उमेश सावंत, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर, अनिल शेटये, बाळा बांदेकर, सुशिल पारकर, माधव शिरसाट व प्रकल्पग्रस्त, स्टॉल धारक, भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या बैठकीत जिल्हाधिकारी दालनात झालेल्या अंतीम चर्चेबाबत आ़मदार नितेश राणे यांनी माहिती दिली़. त्यामध्ये हॉटेल सह्याद्री ते मुख्यचौकापर्यंत दिवाळी असल्याने कोणतीही कारवाई होणार नाही. भाडेकरूंनी आपले बॅलन्सशिट व मालकाचे सम्मतीपत्र सादर केल्यानंतर त्याना मोबदला देण्यात येईल. कणकवलीला विकसीत करताना कोणाच्या पोटावर पाय येणार नाहीत, याची काळजी प्रशासन घेत आहे. जे दावे दाखल झाले आहेत ते दावे येत्या आठ दिवसात निकाली काढण्यात येतील. त्यामुळे सर्वांच्याच सम्मतीने कणकवलीत महामार्गाचे काम करण्यासाठी परवानगी असल्याचे आ़मदार नितेश राणे यांनी या बैठकीत स्पष्ठ केले.

या बैठकीत भाजी विक्रेते, फळ विक्रेते व स्टॉल धारक यांच्यावतीने सुदीप कांबळे यांनी पुर्नवसन करण्याबाबत मागणी केली. तसेच २०१३ च्या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचा उदरनिर्वाह बुडणार आहे. त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून भरपाई मिळावी, अशी भूमिका मांडली. तर त्या मुद्यावर अ‍ॅड. उमेश सावंत यांनी हे महामार्ग भूसंपादन सक्तीच्या पध्दतीने होत आहे़. त्यामुळे जे बेकायदेशीर व्यवसाय करत असतील त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही़.

भाजी विक्रेते, स्टॉल धारकांचे होणार पुर्नवसन !

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून महामार्गावर आपली उपजिवीका चालवत असलेल्या स्टॉल धारक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते अन्य छोट्या व्यापाऱ्यांचे पुर्नवसन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत. त्यामुळे कोणाच्याही पोटावर लाथ बसणार नाही. हे काम विकासासाठी करणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने नगरपंचायतमध्ये लवकरच बैठक आयोजित करून जागा देण्यात येईल, असे आश्वासन आ़मदार नितेश राणे यांनी दिले.

आश्वासने न पाळल्यास काम अडवू !

कणकवलीत प्रकल्पग्रस्त, विविध पक्षाचे नेते आणि आम्ही सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे समाधान झाले आहे. अनेकदा काम अडवून प्रशासनाला आमच्या मागण्या मान्य करायला आम्ही भाग पाडले आहे़. दिलेल्या आश्वासनांवर ठोस कार्यवाही करण्याचा शब्द जिल्हाधिकारी डॉ़ . दिलीप पांढरपट्टे यांनी मंगळवारी बैठकीत दिला आहे़. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर प्रशासनाने शब्द पाळला नाही तर पुन्हा काम अडवू असा इशारा आ़मदार नितेश राणे यांनी दिला.

प्रकल्पग्रस्त राणेंचे ऋणी !

प्रकल्पग्रस्तांची भूमिका घेऊन आ़मदार नितेश राणे आमच्या सोबत लढा देत होते़. खा़सदार नारायण राणे व विविध पक्षाचे नेते यांनी देखील या आमच्या लढ्यात अथक परिश्रम घेतले. इतर पक्षाच्या नेत्यानिहि प्रयत्न केले. त्यामुळेच कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करून विस्थापितांचे पुर्नवसन करून द्यावे, अशी भावना उदय वरवडेकर यांनी या बैठकीत व्यक्त केली.


 

Web Title: The work of four-laning of Kankavali is done by all the consent: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.