महिला आयोगातर्फे रत्नागिरी येथे ७ सप्टेंबरला कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:20 PM2017-09-03T17:20:39+5:302017-09-03T17:20:44+5:30
महिलांचे हक्क व अधिकार तसेच महिलाविषयक कायदे ह्याची जनमानसात जाणीव जागृती व प्रसिध्दी व्हावी यासाठी राज्य महिला आयोगामार्फत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारदार व पीडीत महिलांसाठी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दिनांक ७ सप्टेंबर २0१७ रोजी दुपारी २ वाजता जनसुनावणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सिंधुदुर्गनगरी दि. 0३ : महिलांचे हक्क व अधिकार तसेच महिलाविषयक कायदे ह्याची जनमानसात जाणीव जागृती व प्रसिध्दी व्हावी यासाठी राज्य महिला आयोगामार्फत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २0१३ अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारदार व पीडीत महिलांसाठी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दिनांक ७ सप्टेंबर २0१७ रोजी दुपारी २ वाजता जनसुनावणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळी ९.३0 वाजता शासकीय व अशासकीय कार्यालयातील प्रमुख, अंतर्गत तक्रार समिती अध्यक्ष व सदस्यासाठी, वीर सावरकर नाट्यमंदिर, मेन रोड, माऊली मंदिर बस स्टॉप जवळ, रत्नागिरी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जनसुनावणी कार्यक्रमात महिलांच्या समस्यांची आयोगामार्फत तातडीने दखल घेण्यात येऊन, समस्यांवर त्वरीत उपाययोजना करण्यात येतात. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या समस्याबाबतच्या निवदेनासह जनसुनावणी कार्यक्रमास उपस्थित रहावे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २0१३ अंतर्गत शासकीय व अशासकीय कार्यालयातील प्रमुख, अंतर्गत तक्रार समिती अध्यक्ष व सदस्यांनी उपरोक्त वेळी व ठिकाणी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन सोमनाथ रसाळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.