कणकवलीत 'लेखन सौंदर्य' या विषयावरील कार्यशाळा
By admin | Published: January 25, 2017 04:54 PM2017-01-25T16:54:13+5:302017-01-25T16:54:13+5:30
कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने येथील लक्ष्मी विष्णु मंगल कार्यालयात 29 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांची 'लेखन सौंदर्य' या
Next
>ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 25 - कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने येथील लक्ष्मी विष्णु मंगल कार्यालयात 29 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांची 'लेखन सौंदर्य' या विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख शेखर राणे व बाळकृष्ण ठाकुर यांनी दिली.
येथील विजय भवनमध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, युवा सेना जिल्हा प्रमुख अॅड. हर्षद गावडे, तालुका संपर्क प्रमुख शंकर पार्सेकर, नगरसेवक सुशांत नाईक, अनिल हळदिवे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख स्नेहा तेंडोलकर, उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर आदी उपस्थित होते.
यावेळी शेखर राणे म्हणाले, शिवसेना वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाजकारण हे ब्रीद लक्षात घेवून काम करीत आहे. त्यामुळे विविध समाजोपयोगी उपक्रम शिवसेनेच्यावतीने राबविले जातात. युवकांना करियर मार्गदर्शनही करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी ही सुलेखन कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
बाळकृष्ण ठाकुर म्हणाले, दहावी तसेच बारावीच्या परिक्षेनंतर पुढे काय असा प्रश्न अनेक मुलांना पड़त असतो. अशा मुलांना योग्य दिशा देण्याचे ककाम होणे गरजेचे आहे.त्यामुळे ही कार्यशाळा महत्वपूर्ण अशी आहे. कलेच्या क्षेत्रात अनेक क्षितिजे विस्तारली गेली आहेत. त्याची ओळख अनेकांना नसते. त्यामुळे करियर निवडताना अडचणी निर्माण होतात. या अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रविवारी होणाऱ्या या कार्यशाळेतून कला क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत इयत्ता आठवी ते दहावी मधील कलेत रस असलेल्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यानी आपल्या पालकानाही सोबत आणायचे आहे. असे झाले तर सुलेखनाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्याना करियर कसे करता येऊ शकते हे त्यांना समजेल. तसेच करियर निवडताना त्यांना त्याचा उपयोग होईल.
या कार्यशाळेत सुप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव तसेच त्यांचे सहकारी कृष्णकांत ठाकूर , महेंद्र परब, राजेंद्र महाडिक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सुलेखन कलेवर प्रात्यक्षिक आणि विद्यार्थी ,पालक तसेच शिक्षकांशीही यावेळी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवहनही यावेळी करण्यात आले.