पत्रकाराच्या लेखनातून ज्वाळा याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 11:57 PM2016-03-16T23:57:55+5:302016-03-17T00:06:04+5:30
बाळासाहेब पाटणकर : पत्रकारांसाठीची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात
रत्नागिरी : जिथे अन्याय होतो तिथे पत्रकारांनी कुठलाही धर्म, पंथ न पाहता पुढे व्हायला हवे, त्याच्या लेखनातून ज्वाळा येण्याचे सामर्थ्य निर्माण व्हायला हवे, समाज एकत्र आणण्याचे कार्य पत्रकारच करू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटणकर यांनी पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत अध्यक्षपदावरून बोलताना केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त हे वर्ष सामाजिक न्याय व समता वर्ष जाहीर करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून सहाय्यक आयुक्त आणि समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या कुवारबांव येथील सभागृहात दि. १५ रोजी पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पाटणकर, नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये उपस्थित होते. तसेच जात पडताळणी विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, रशीद साखरकर, जिल्हा माहिती अधिकारी विजय कोळी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने उपस्थित होते.
आपल्याला सामाजिक न्याय हवाय, तो मिळालाय का? याबाबत पत्रकारांनी आत्मचिंतन करायला हवे, असे पाटणकर यांनी सांगितले. आपण अन्याय सहन करत बसतो. पण तो दूर करण्यासाठी कमी पडतो.
बाबासाहेबांचे पत्रकारितेतील योगदान कथन करताना त्यांचे पहिले साप्ताहिक ‘बहिष्कृत भारत’, मूकनायकमधील लेखनाचा उहापोह हेगशेट्ये यांनी केला. प्रस्तावनेत पूर्वीच्या राज्यसत्ताक पद्धती मोडून काढण्याचे काम पूर्वापार वृत्तपत्रांनी केले आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद राज्यघटनेत असल्याचेही प्रस्तावनेत नमूद केले असल्याचे प्रमोद जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी