चुकीची धोरणे शेतकऱ्यांच्या मुळावर

By Admin | Published: September 26, 2016 10:09 PM2016-09-26T22:09:16+5:302016-09-26T23:17:10+5:30

अरुण लाड : कुंडल येथे क्रांतिअग्रणी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा

Wrong policies about farmers | चुकीची धोरणे शेतकऱ्यांच्या मुळावर

चुकीची धोरणे शेतकऱ्यांच्या मुळावर

googlenewsNext

कुंडल : शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका ऊस उत्पादक, सभासद व साखर कारखान्याला बसत असल्याचे प्रतिपादन क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी केले. कुंडल येथे क्रांतिअग्रणी कारखान्याच्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, कारखान्याने आतापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त केले आहेत. कारखान्याने निर्यात केलेल्या साखरेवर शासन चाळीस टक्के कर लावत आहे. पण सर्वसाधारण ऊस उत्पादकांचा विचार शासन करताना दिसत नाही. शासनाने जाहीर केल्यानुसार ऊस उत्पादकांना एक टनामागे ४५ रुपये अनुदान शासन देणार होते, तेही या शासनाकडून देण्यात आले नाही. पण आम्ही पुढाकार घेऊन ऊस उत्पादकांना ४५ रुपये अदा केले आहेत. २००९-१० मध्ये ऊस उत्पादकांकडून प्रतिटन १०० रुपये कपात केलेली रक्कम व्याजासह ६ कोटी ६८ लाख ३२ हजार ऊस उत्पादकांना परत करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कारखाना ऊस उत्पादकांच्या हिताकरिता कटिबद्ध असून, त्यादृष्टीने ऊस विभाग सुरू केला आहे. या विभागाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
पाणी बचतीसाठी कारखान्याने येणाऱ्या ऊस क्षेत्रापैकी ४२ टक्के ऊस क्षेत्र ठिबकवर केले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना लवकरच उपपदार्थ निर्मिती करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारखान्याचे संस्थापक डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. संचालक सतीश चौगुले यांनी स्वागत केले. अंकुश यादव यांनी आदरांजली वाचन केले. कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांनी अहवाल वाचन केले. शामराव जाधव, आप्पासाहेब कोरे यांनी विषय वाचन केले. विनोद देशमुख, दिलीप सव्वाशे, अशोक पवार, मानसिंग पाटील, बाबूराव पवार, हिम्मत पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी किरण लाड, उदय लाड, शरद लाड, दिलीप जाधव, दिलीप सव्वाशे, अण्णा सिसाळ, पी. एस. माळी, संतोष मोरे, रामचंद्र सूर्यवंशी, तानाजी जाधव, डॉ. योगेश लाड, सुमनताई गायकवाड, सुलोचना कुंभार, मनीषा लाड, वसंत लाड, पंडित पाटील, राजेंद्र पाटील, संदीप पाटील, बयाजी माने, वैभव पवार, नंदाताई पाटील, सर्जेराव पवार, आकाराम पाटील, मधुकर कांबळे, दिनकर लाड, कुंडलिक एडके, जगन्नाथ आवटे, सुबराव लाड, शहाजी लाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)


केवळ आश्वासने : पूर्तता नाहीच

Web Title: Wrong policies about farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.