आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 10:55 AM2020-12-29T10:55:13+5:302020-12-29T10:58:55+5:30

anganewadi jatra - नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षीकोत्सव शनिवार ६ मार्च २०२१ रोजी होणार आहे.

Yatra of Anganwadi Shri Devi Bharadi Mata on 6th March | आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला

आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला

Next
ठळक मुद्देआंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा मर्यादित स्वरूपात होणार

मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षीकोत्सव शनिवार ६ मार्च २०२१ रोजी होणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर होणारा हा वार्षिकोत्सव यावर्षी मर्यादित स्वरूपात फक्त आंगणेकुटुंबिय आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली.

भाविकांच्या होणा-या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांना नम्र विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस नमस्कार व आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

Web Title: Yatra of Anganwadi Shri Devi Bharadi Mata on 6th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.