यावर्षीचा शिक्षण मेळावा रद्द, शिक्षण समिती सभेत एकनाथ आंबोकर यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:19 AM2021-01-14T11:19:37+5:302021-01-14T11:21:04+5:30

Education Sector Zp Sindhudurg- शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना करिअरसंदर्भात मार्गदर्शन करणारे सिंधु एज्युकेशन एक्स्पो अर्थात शिक्षण मेळावा २०२०-२१ यावर्षी होणार नाही. हा मेळावा शासन निर्देशानुसार रद्द करण्यात आला असून, यासाठी असलेला निधी शाळा दुरुस्ती व अन्य शैक्षणिक उपक्रमांवर खर्च केला जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शिक्षण समिती सभेत दिली.

This year's education meet has been canceled, informed Eknath Ambokar at the education committee meeting | यावर्षीचा शिक्षण मेळावा रद्द, शिक्षण समिती सभेत एकनाथ आंबोकर यांची माहिती 

यावर्षीचा शिक्षण मेळावा रद्द, शिक्षण समिती सभेत एकनाथ आंबोकर यांची माहिती 

Next
ठळक मुद्देयावर्षीचा शिक्षण मेळावा रद्दशिक्षण समिती सभेत एकनाथ आंबोकर यांची माहिती 

सिंधुदुर्ग : शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना करिअरसंदर्भात मार्गदर्शन करणारे सिंधु एज्युकेशन एक्स्पो अर्थात शिक्षण मेळावा २०२०-२१ यावर्षी होणार नाही. हा मेळावा शासन निर्देशानुसार रद्द करण्यात आला असून, यासाठी असलेला निधी शाळा दुरुस्ती व अन्य शैक्षणिक उपक्रमांवर खर्च केला जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शिक्षण समिती सभेत दिली.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, समिती सदस्य सरोज परब, उन्नती धुरी, विष्णूदास कुबल, डॉ. अनिशा दळवी, गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्गजिल्हा परिषदेमार्फत गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी सिंधु कृषी, पशु, पक्षी मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याचा येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्यसिंधु एज्युकेशन एक्स्पोह्ण आयोजित करण्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुरुवात केली.
सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. असे असताना जिल्ह्यातील मुले करिअर क्षेत्रात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात.

यामुळे जिल्ह्यातील मुलांनी दहावी, बारावीनंतर काय करावे, कोणते क्षेत्र निवडावे, तसेच शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण व्हावी, यासाठी जिल्ह्यात ह्यसिंधु एज्युकेशन एक्स्पोह्ण आयोजित करण्यात येतो. २०१९मध्ये राबविण्यात आलेल्या सिंधू एज्युकेशन एक्स्पोला मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, हा मेळावा २०२०मध्ये कोरोनामुळे आयोजित केला नव्हता. तो २०२१मध्येही रद्द केला आहे.

याद्या मंजुरीत वेळ जात असल्याने दुरूस्त्या नाहीत

शाळा दुरुस्तीच्या मुद्यावर सभेत चर्चा झाली असता शाळा दुरुस्तीला वेळ का लागतो? निधी खर्च का होत नाही, असा प्रश्न सदस्यांनी केला. यावर सदस्यांकडून शाळा दुरुस्तीच्या याद्या मंजूर करण्यात वेळ जातो. या याद्या वेळेत मंजूर करून न मिळाल्याने आणि वर्ष अखेरीस मंजुरी दिली जात असल्याने शाळा दुरुस्तीची पुढील कार्यवाही करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी वेळ जात असल्याचे आंबोकर यांनी सांगितले. तसेच सदस्यांनी वेळेत याद्या मंजूर केल्यास निधी ही १०० टक्के खर्च होऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: This year's education meet has been canceled, informed Eknath Ambokar at the education committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.