योगेश तावडे यांना शिवसन्मान पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:03 PM2019-03-29T14:03:48+5:302019-03-29T14:05:06+5:30
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्रामार्फत दिला जाणारा महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार ओरोस ...
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्रामार्फत दिला जाणारा महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार ओरोस येथील युवा सामाजिक कार्यकर्ते योगेश राजाराम तावडे यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार कोल्हापुर येथील एका कार्यक्रमात जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्राच्यावतीने महाराष्ट्राच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या आणि सामाजिक कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील तरुण तरुणांना शिवसन्मान पुरस्कार दिला जातो. तसेच त्यांनी केलेल्या कार्याची नोंद भारत सरकार मान्य आयएसबीएन युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकोर्डमध्ये केली जाते.
नागरिकांना रात्री अपरात्री मदत करणे, सामाजिक कार्यात पुढे असणे आदी विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ओरोस गावडेवाडी येथील योगेश राजाराम तावडे या युवकाच्या कार्याची किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र या संस्थेने दखल घेत त्याला युवा समाजिक कार्यकता शिवसन्मान पुरस्कार जाहीर केला होता.
कोल्हापुर शाहू महाराज स्मारक हॉल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या छत्रपती शिवराय नवरंग कला, साहित्य, संमेलन कोल्हापुर २०१९ मध्ये जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते योगेश तावडे यांना शिवसन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून त्याच्या कार्याची नोंद युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकोर्डमध्ये झाली असून त्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.