संसाराचा डोलारा सांभाळत बारावीत पटकाविला प्रथम क्रमांक, नाटळ चव्हाणवाडी येथील महिलेचा आदर्श

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 25, 2024 02:14 PM2024-05-25T14:14:20+5:302024-05-25T14:14:36+5:30

मिलिंद डोंगरे कनेडी ( सिंधुदुर्ग ) : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते ते शेवटच्या क्षणापर्यंत घेऊ शकतो. काहींना शिक्षणाची एवढी ...

Yogita Chavan secured 74.50 percent marks in the 12th examination | संसाराचा डोलारा सांभाळत बारावीत पटकाविला प्रथम क्रमांक, नाटळ चव्हाणवाडी येथील महिलेचा आदर्श

संसाराचा डोलारा सांभाळत बारावीत पटकाविला प्रथम क्रमांक, नाटळ चव्हाणवाडी येथील महिलेचा आदर्श

मिलिंद डोंगरे

कनेडी (सिंधुदुर्ग) : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते ते शेवटच्या क्षणापर्यंत घेऊ शकतो. काहींना शिक्षणाची एवढी ओढ असते की ती कुठल्याही परिस्थितीत मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि आपल्या आकांशा पूर्णही करतात. आपल्याकडे जिद्द, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, आत्मविश्वास असेल तर कुठली ही गोष्ट कठीण नसते. हा आत्मविश्वास श्री मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडीच्या योगिता चव्हाण यांनी खरा करून दाखविला आहे. बारावीच्या बोर्ड परीक्षेत कला शाखेत ७४.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकावर त्यांनी आपली मोहर उठविली आहे. त्यांचे हे यश निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

योगिता यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण रामगड येथील प्रगत विद्यामंदिर रामगड येथे झाले. त्यांचे आईवडील शेतकरी होते. भावंडांमध्ये त्यामोठ्या होत्या. गरीब परिस्थिती मुळे त्यांना दहावीनंतर पुढील शिक्षणावर पाणी सोडावे लागले. लहानपणा पासूनच हुशार असलेल्या कुबल यांनी जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर दहावीत ७४ टक्के मिळवत रामगड हायस्कूलचे नाव उज्वव केले होते. मागे तीन बहिणी आणि वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांना शिक्षणाची ओढ असून सुद्धा शिक्षणाचा प्रवास तेथेच थांबवावा लागला.

नंतर २००८ मध्ये त्यांचे नाटळ येथील एकनाथ चव्हाण यांच्याशी शुभमंगल झाले. लग्न झाल्यानंतर मुले ,संसारात शिक्षणाची आवड असतानाही शिकता आले नाही. परंतु त्या याही कालावधीत गप्प बसल्या नाहीत .हरहुन्नरी असलेल्या योगिता या स्वतः पावरट्रेलर चालवत आपल्या पतीसोबत शेतीच्या कामात अग्रेसर असायच्या. एव्हाना मुले साधारण मोठी झाली होती. मोठा मुलगा निखिल ८ वी व लहान मुलगा साईराज हा सातवित शिकत होता.

संसाराच्या व्यापामुळे काहीवेळा दांडी

आपल्या पुढील शिक्षणाला पोषक वातावरण बघून योगिता यांनी याबात आपल्या पती एकनाथ यांना विचारले, त्यांचा आणि मुलांचा कौल मिळताच त्यांनी कनेडी कॉलेजमध्ये आपले नाव दाखल केले.बघता बघता अकरावी संपून बारावीत प्रवेश झाला. संसाराच्या व्यापामुळे काही वेळा कॉलेजला दांडी मारावी लागत होती .परंतु मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यशामध्ये पतीसमवेत मुलांचाही वाटा

बारावीच्या परीक्षेत रात्र रात्र जागून अभ्यास केला त्याचे फळ त्यांना मिळाले. कनेडी कॉलेज च्या कला शाखेतून प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला. या यशात त्यांच्या पती राजांबरोबरोबरच मुलांनीही खारीचा वाटा उचलत सहकार्य केले. त्यामुळेच आपण यशाला गवसणी घालू शकले असल्याचे त्या म्हणाल्या .

प्रेरणादायी यश

कणकवली तालुक्यातील नाटळ चव्हाण वाडी येथील योगिता चव्हाण यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांनी आपली जिद्द ,आत्मविश्वास ,प्रयत्न, इच्छाशक्ती डळमळू न देता यशाला गवसणी घातली. त्यांचे हे यश नेहमीच विद्यार्थ्यांना आदर्शवत व प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.

नर्सिंग क्षेत्र निवडणार

बारावी नंतर आपण नर्सिंग क्षेत्र निवडणार आहे. मला त्या क्षेत्रात आवड असल्याने आपण त्यातच करीयर करून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्यरत रहाणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

Web Title: Yogita Chavan secured 74.50 percent marks in the 12th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.