हरकुळ बुद्रुक येथील युवकाने महिलेला ओढ्यात ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 05:27 PM2019-09-05T17:27:33+5:302019-09-05T17:30:22+5:30

हरकुळ बुद्रुक पठाणवाडी येथील साकवाजवळ एका युवकाने महिलेला ओढ्यात ढकलल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

A young man from all over Budruk pushed the woman | हरकुळ बुद्रुक येथील युवकाने महिलेला ओढ्यात ढकलले

हरकुळ बुद्रुक येथील युवकाने महिलेला ओढ्यात ढकलले

Next
ठळक मुद्देहरकुळ बुद्रुक येथील युवकाने महिलेला ओढ्यात ढकललेकणकवली पोलिसांत तक्रार : पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात

कणकवली : हरकुळ बुद्रुक पठाणवाडी येथील साकवाजवळ एका युवकाने महिलेला ओढ्यात ढकलल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

हरकुळ बुद्रुक पठाणवाडी येथील रोहिणी पंढरीनाथ हरकुळकर (४५) या हरकुळ येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी त्या आपल्या घरी परतत होत्या.

यावेळी आदिमशहा इब्राहिमशहा पटेल (२४, रा. हरकुळ बुद्रुक कुंभारवाडी) हा हरकुळ बुद्रुक पठाणवाडीजवळील साकवाच्या अलीकडे लघुशंकेसाठी उभा होता. त्याने अचानक रोहिणी हरकुळकर यांना पाठीमागून धावत येऊन पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना तेथील ओढ्यात त्याने ढकलून दिले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. रोहिणी हरकुळकर यांनी जोरात आरडाओरडा केल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले.

रोहिणी हरकुळकर यांना ओढ्यात ढकलल्यामुळे त्यांच्या कुशीत दगड लागल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत रोहिणी हरकुळकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आदिमशहा पटेल याला ताब्यात घेतले असून अधिक तपास करण्यात येत आहे.

Web Title: A young man from all over Budruk pushed the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.