बंदुकीचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 02:26 AM2020-06-23T02:26:19+5:302020-06-23T02:26:23+5:30

कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत पोकळे हा घरातून एकटाच शिकारीला जात असे. त्याच्या शेताच्या आजूबाजूला गवेही मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून शेत राखण्यासही तो जात असे.

Young man killed by gunfire | बंदुकीचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू

बंदुकीचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू

Next

सावंतवाडी : कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत रामचंद्र पोकळे (२८) हा युवक शिकारीसाठी गेला असताना त्याच्या हातातील बंदुकीचा स्फोट होऊन हाताला जखम झाली. तसेच बंदुकीच्या आतील छर्रे शरीराला लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.
कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत पोकळे हा घरातून एकटाच शिकारीला जात असे. त्याच्या शेताच्या आजूबाजूला गवेही मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून शेत राखण्यासही तो जात असे.
शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास बंदूक घेऊन तो घरातून शिकारीसाठी निघून गेला होता. मात्र, काही वेळातच तो पुन्हा घरी आला. तेव्हा त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता. त्याने आपल्या घरात येऊन भावाला लगेच रुग्णालयात चल असे सांगितले. त्यामुळे त्याला तातडीने त्याचा भाऊ एकनाथ हा रुग्णालयात घेऊन आला. त्याला सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्या भावाच्या माहितीनुसार तक्रार दाखल करून घेतली असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस हेडकॉन्स्टेबल लोहकरे करीत आहेत.
>एकटाच शिकारीला जाण्याची सवय
अभिजीत याच्या शरीरावरही बंदुकीचा स्फोट झाला. बंदुकीचे छर्रे उडाल्याने त्याला जखमा झाला. याबाबत मृत अभिजीतचा भाऊ एकनाथने पोलिसांना माहिती दिली. यात आपल्या भावाला शिकारीस जाण्याची सवय होती. तो एकटाच शिकारीला जात असे. तसा तो शनिवारीही गेला होता. मात्र, काही वेळातच पुन्हा तो घरी आला तेव्हा त्याने बंदुकीचा स्फोट झाल्याचे आम्हाला सांगितले. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, असे त्याने स्पष्ट केले.

Web Title: Young man killed by gunfire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.