किडनीच्या आजाराने युवतीचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:21 PM2020-02-04T16:21:02+5:302020-02-04T16:24:24+5:30

गेले काही दिवस किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या कलमठ- बिडयेवाडी येथील प्रतीक्षा पांचाळ (२०) हिचे मुंबई येथे अधिक उपचारासाठी नेले असताना निधन झाले. सुस्वभावी असलेल्या प्रतीक्षा हिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Young woman dies of kidney disease | किडनीच्या आजाराने युवतीचे निधन

किडनीच्या आजाराने युवतीचे निधन

Next
ठळक मुद्देकिडनीच्या आजाराने युवतीचे निधनडायलेसिस सुरू करण्यासोबतच किडनी बदलण्याचा सल्ला

कणकवली : गेले काही दिवस किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या कलमठ- बिडयेवाडी येथील प्रतीक्षा पांचाळ (२०) हिचे मुंबई येथे अधिक उपचारासाठी नेले असताना निधन झाले. सुस्वभावी असलेल्या प्रतीक्षा हिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

प्रतीक्षावर सिंधुदुर्गातच डायलेसिस सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी तिला जास्त त्रास होऊ लागल्यामुळे अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. मात्र, उपचार करण्यापूर्वीच तिचे निधन झाले.

किडनीच्या आजारापूर्वी कणकवली येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रतीक्षा सुर्इंग टेक्नॉलॉजी ट्रेडमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेली होती. तेथे शिक्षण घेत असताना सातत्याने तिला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. सततच्या त्रासाबद्दल त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे वडिलांनी नेले असता, तिचा रक्तदाब २१० पर्यंत वाढला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवून काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला.

मात्र, मुंबईत किडनी स्पेशालिस्ट तपासणीत तिच्या दोन्ही किडन्यांची साईज लहान असून त्यांची क्षमताही कमी झाल्याने क्रिएटीन वाढत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तातडीने डायलेसिस सुरू करण्यासोबतच किडनी बदलण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला.

सिंधुदुर्गात तिचे डायलेसिस बरेच दिवस सुरू होते. तर नात्यातील किडनी देण्यापासून ते पुढील तपासण्या करणे, किडनी बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यापर्यंत सर्वच प्रक्रियेसाठी सुमारे २० लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी तिचे नातेवाईक प्रयत्नशीलही होते. मात्र, उपचारासाठी तिला मुंबईला नेले असता, तेथेच तिचे निधन झाले.

बैलाला हाकलण्यासाठी गेलेल्या युवकाचे निधन

देवगड : बैलाला हाकलण्यासाठी गेलेला पडेल मधलीवाडी येथील अभिनव अशोक तांबे (२२) हा युवक घराशेजारीच बेशुध्दावस्थेत आढळल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात केले. तेथे तो मृत झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेल मधलीवाडी येथील अभिनव अशोक तांबे हा सोमवारी सकाळी घराकडे बैल येत असल्याने हाकलण्यासाठी गेला. काही वेळाने तो घराशेजारीच असलेल्या उताराच्या ठिकाणी बेशुध्दावस्थेत आढळला. त्याचे चुलते अनंत तांबे व ग्रामस्थांनी त्याला तत्काळ उपचारासाठी देवगड येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले.

डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. त्याच्या मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. याबाबत अनंत तांबे यांनी देवगड पोलिसांत माहिती दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Young woman dies of kidney disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.