आपले सरकार पोर्टलवर
By admin | Published: May 24, 2017 03:47 PM2017-05-24T15:47:39+5:302017-05-24T15:47:39+5:30
सहकार विभागाच्या पाच सेवा
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. २४ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २0१५ अंतर्गत अधिसुचित लोकसेवा महाराष्ट्र शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en संकेत स्थळावर आॅनलाईन करण्यात आलेल्या सेवांमध्ये सहकार विभागाच्या विविध पाच सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. सहकारी संस्थांची नोंदणी करणे. सहाकारी संस्थांची उपविधी दुरुस्ती करणे. सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण देणे व सहाकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण करणे.
नागरीकांनी पाच सेवांबाबत आॅनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेल्या असून आपले सरकार या पोर्टवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या संकेतस्थळाचा वापर करुन या सेवांचा लाभ घेता येईल. याबाबतची प्रसिध्दी या कार्यालयाचे अधिपत्याखालील सहाय्यक निबंधक-सहकारी अधिकारी श्रेणी एक, सहकारी संस्था, तालुका कार्यालयांत करण्यात आलेली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरीक तहसिल कार्यालयात असणा-या सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र यांचा वापर करु शकतात, असे आवाहन सहकारी संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक डॉ. मेघा जी. वाके यांनी केले आहे.