ेवगड येथील युवकाचा शिवगंगा नदीत बुडून मृत्यू
By Admin | Published: March 5, 2017 11:14 PM2017-03-05T23:14:45+5:302017-03-05T23:14:45+5:30
पाडागर-सैतवडे येथील घटना : पोहणे जिवावर बेतले
शिरगाव : पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगाव पाडागरवाडी येथील सैतवडे धबधब्यापासून सुमारे ८० ते ९० मीटर अंतरावर असलेल्या पियाळी-शिवगंगा नदीपात्रात देवगड येथून मौजमजेसाठी आलेल्या सात मित्रांपैकी आशिष अल्हाद कुलकर्णी (वय ३२, रा. देवगड सातपायरी) या युवकाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड सातपायरी येथील आशिष कुलकर्णी याच्या मालकीची (एमएच ०७, क्यू ७५२२) गाडी भाड्याने घेऊन वीरेंद्र जाधव (रा. वाडा मूळबांध), मिलिंद माने (रा. देवगड जगतापवाडी), प्रकाश कोयंडे (रा. मोंड), संतोष घारे (रा. इळये-पाटथर), प्रमोद चव्हाण (रा. कुणकेश्वर), संतोष पवार (रा. इळये-असरोंडी) हे सातजण पाडागर-सैतवडे धबधब्यानजीक मौजमजा करण्यासाठी दुपारी एक वाजता आले होते. सैतवडे धबधबा ज्या पियाळी-शिवगंगा नदीतून वाहतो त्या नदीपात्राजवळ या सात मित्रांनी जेवण शिजविले. त्यातील काहीजण हे धबधब्यापासून ८० ते ९० मीटर अंतरावर असलेल्या कोंडीत पोहण्याचा आनंद लुटत असताना आशिष याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने नदीत बुडाला. याबाबत वीरेंद्र जाधव याने पोलिसांत माहिती दिली.
शिरगाव पाडागर सैतवडे धबधब्यापासून शिवगंगा नदीचे संपूर्ण पात्र काळीथर दगडाचे आहे. या नदीपात्रात धबधब्यापासून वाहत आलेल्या पाण्याचा गोल भोवरा तयार होतो. नदीपात्रात काळीथर कडेकपारी, भुयारी मार्ग आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बुडालेल्या आशिष कुलकर्णी याचा मृतदेह तब्बल तीन तासांनी सायंकाळी ६.१२ वाजता हुमरठ येथील कृष्णा होळकर व तात्या होळकर या घोरपी समाजबांधवांनी खोल पाण्यात उतरून बाहेर काढला.
याबाबतची घटना समजताच शिरगाव येथील विविध सामाजिक संस्थांचे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनीही मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. देवगड पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, शिरगाव पोलिस दूरक्षेत्राचे अंमलदार विजय कांबळी, पराग मोहिते, प्रशांत जाधव, नितीन शेट्ये, दादा परब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी देवगड पंचायत समितीचे सभापती रवींद्र जोगल, पंचायत समिती सदस्य सदानंद देसाई, संतोष किंजवडेकर, माजी सरपंच अमित साटम, शशिकांत गोठणकर, भाई आईर, राजेंद्र तावडे, पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, मिलिंद साटम, संदीप साटम, राजेंद्र शेटये, मंगेश लोके, मंगेश धोपटे, संतोष फाटक, आदी उपस्थित होते.
आशिष कुलकर्णी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच देवगड येथील ग्रामस्थ, विविध स्तरातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळाचे वातावरण शोकाकुल झाले होते. (प्रतिनिधी)
नदीपात्रातील पाण्याचा अंदाज येत नाही
शिरगाव-पाडागर सैतवडे धबधब्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे व बारमाही हा धबधबा वाहत असल्याने दररोज पर्यटक येथे मौजमजा करण्यासाठी येत असतात. मुळातच या धबधब्याच्या नदीपात्रातील रचना ही कडेकपारी काळीथर दगडाची आहे. यात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. शिवाय वाहत्या पाण्याला वेग असल्याने पाण्याचा भोवरा तयार होतो. शिवगंगा नदीवरील फोंडा-घोणसरी धरणातून पाणी सोडले जात असल्याने पाण्याच्या पातळीचा अंदाज येत नाही. येथे यापूर्वीही बुडून