युवा साहित्य दिंडीला अवघी तरूणाई अवतरली
By admin | Published: January 23, 2016 11:19 PM2016-01-23T23:19:20+5:302016-01-23T23:19:20+5:30
कोकण मराठी साहित्य परिषद : झांज, लेझीमच्या तालावर साहित्यप्रेमी थिरकले...
देवरूख : कोमसापतर्फे आयोजित केलेल्या कोकण विभागीय साहित्य संमेलनाची साहित्य दिंडी शनिवारी सायंकाळी देवरूख शहरातून काढण्यात आली. झांज पथक, लेझीम पथक व विविध चित्ररथ यांमुळे ही साहित्य दिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दिंडीमध्ये सुमारे १५०० साहित्यप्रेमी सहभागी झाले होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी होणार आहे.
साहित्य दिंडीचा प्रारंभ सद्गुरु लोकमान्य वाचनालय येथून करण्यात आला. स्वागताध्यक्ष रोहन बने, संमेलनाध्यक्ष दक्षता लिंगायत, उद्घाटक अशोक नायगावकर, माजी आमदार सुभाष बने, कोमसापचे जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, देवरूख महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य सुरेश जोशी यांच्यासह कोमसाप शाखेचे सर्व पदाधिकारी, युवा साहित्यिक, नागरिक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. अनमोल साहित्य असलेली पालखी मान्यवरांनी घेऊन ही दिंडी सुरू करण्यात आली.
मातृमंदिर, बाजारपेठ, रिक्षा स्टॅण्ड, शिवाजी चौकमार्गे माटे - भोजने सभागृह अशी ही दिंडी काढण्यात आली. दिंडीच्या सुरुवातीला ढोल पथक, सावित्रीबाई महिला विद्यालयाचे झांजपथक, देवरूख नं. ३ शाळेच्या विद्यार्थ्यांचा संतांची परंपरा असलेला देखावा, तसेच शाळा नं. ४ शाळेचे संस्कृतीचे दर्शन जय मल्हार असा देखावा सादर करण्यात आला होता. पाध्ये मीडियम स्कूलचे लेझीम पथक, न्यू इंग्लिश स्कूल, देवरूखचा एन. एस. एस. विभाग, विद्यार्थी, तायक्वाँदोपटू व राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचा महिला विभाग सामील झाला होता.
रॅलीत प्रत्येक चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी व झांज पथकाच्या विविध नृत्यांच्या स्टेप साकारण्यात आल्या. या नृत्याला उपस्थितांनी दाद देऊन कौतुक केले. या रॅलीत शंकर शेट्ये, बापू शेट्ये, पपू नाखरेकर, संमेलन समिती अध्यक्ष दीपक लिंगायत, संमेलनप्रमुख युयुत्सू आर्ते, कार्यवाह प्रमोद हर्डीकर, युवा शक्तीप्रमुख प्रशांत परांजपे, अभिमन्यू शिंदे, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, अश्विनी सावंत, निकिता रहाटे, स्मिता लाड, माजी नगराध्यक्ष नीलम हेगशट्ये, नमिता क ीर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बोथले, शशांक घडशी, सुरेंद्र्र माने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)