दुचाकी नंबरप्लेटची ‘झेड सीरीज’ संपली

By admin | Published: December 23, 2014 10:16 PM2014-12-23T22:16:19+5:302014-12-23T23:43:52+5:30

‘डबल ए’ने सुरु : ५६0 वाहनांची नवीन नोंदणी

The Z-series of two-wheeler number is over | दुचाकी नंबरप्लेटची ‘झेड सीरीज’ संपली

दुचाकी नंबरप्लेटची ‘झेड सीरीज’ संपली

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटारसायकलच्या नंबरप्लेटवर घालण्यात येणारी झेडपर्यंतची सिरीज संपल्याने आता जिल्ह्यातील नवीन मोटारसायकलवर ‘डबल ए’ अशी सिरीज सुरु झाली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून सिंधुदुर्गात या नवीन सिरीजनुसार ५६० मोटारसायकलची नोंदणी करण्यात आली आहे.
एखादे वाहन खरेदी केल्यावर त्याची अधिकृतपणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी केली जाते. नंतर त्या वाहनाला आरटीओकडून पासिंग व वाहनक्रमांक दिला जातो. त्यासाठी वाहनक्रमांकाच्या अगोदर ए ते झेड पर्यंतची सिरीज वापरली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोटारसायकलच्या नंबरप्लेटची ए ते झेडपर्यंतची सिरीज संपल्याने आता नंबरप्लेटवर डबल ए अशी सिरीज वापरायला सुरुवात केली आहे.
२ नोव्हेंबर १९८२ साली सिंधुदुर्गनगरी येथे प्रादेशिक परिवहन विभागाची स्थापना झाल्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत ए ते झेड या सिरीजमधील १ लाख १० हजार ८४४ मोटारसायकलची नोंद करण्यात आली. या वाहनामध्ये ७६ हजार ९४६ मोटारसायकल, २९०७७ स्कूटर व ४८२१ मोटेड (लुना) यांचा समावेश आहे. आता या गाड्यांची सिरीज ए ते झेडपर्यंत होती. ती आता संपल्याने जिल्ह्यात ए ए अशी सिरीज सुरु झाली आहे, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)

Web Title: The Z-series of two-wheeler number is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.