धक्कादायक! मुलीच्या पोटातुन काढला १ किलो केसांचा गोळा..असा कोणता आजार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 07:06 PM2022-11-13T19:06:32+5:302022-11-13T19:07:37+5:30
मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. आधी अपचन, अॅसिडिटी ही कारणे वाटली म्हणून त्यापद्धतीने उपचार केले पण फरक दिसला नाही. त्यानंतर धक्कादायक चित्र समोर आले.
मुलींचे केस सहसा लांब असतात. लांब केसच अनेक मुलींना आवडतात. पण हेच केस कोणी खाईल का? होय, वसईत राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीला केस खाण्याची सवय होती. हा खरे तर Rapunzel syndrome रपेंझल सिंड्रोम आहे. या दुर्मिळ सिंड्रोममध्ये रुग्ण स्वत:चेच केस ओढतात आणि खातातही.
वसईमध्ये राहणारी ही मुलगी १३ वर्षांची आहे. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. आधी अपचन, अॅसिडिटी ही कारणे वाटली म्हणून त्यापद्धतीने उपचार केले पण फरक दिसला नाही. यानंतर सोनोग्राफी केल्यावर धक्कादायक चित्र समोर आले. तिच्या आतड्यांमध्ये केसांचा गोळा दिसला. सर्जरी करुनच हा गोळा काढता येणार होता. सर्जरीनंतर ३२ इंच केसांचा १.२ किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला.
१९६८ मध्ये या सिंड्रोम चा शोध लागला. रपेंझल या एका काल्पनिक पात्रावरुन या सिंड्रोमचे नाव ठेवले गेले. यामध्ये रुग्ण केस ओढून खातात. सुरुवातीला याचे निदान करणे कठीण असते मात्र याचे गंभीर परिणाम होतात. हा सिंड्रोम महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. १० पैकी ८ लहान मुले या सिंड्रोमचा शिकार बनतात.