बाबो! आइसलॅंडमधील McDonald चा शेवटचा बर्गर, १० वर्षांनंतरही आहे जसाच्या तसा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:31 PM2019-11-02T13:31:58+5:302019-11-02T13:34:10+5:30
जर तुम्हाला एखादा एक दिवस शिळा बर्गर खाण्यास दिला तर वाकडं तोंड करून निघून जाल. अर्थातच कुणीही म्हणेल की, हा बर्गर खराब झालेला आहे.
जर तुम्हाला एखादा एक दिवस शिळा बर्गर खाण्यास दिला तर वाकडं तोंड करून निघून जाल. अर्थातच कुणीही म्हणेल की, हा बर्गर खराब झालेला आहे. अशात जर तुम्हाला सांगितलं की, एक १० वर्ष जुना बर्गर अजूनही खराब झालेला नाही. होय...हा बर्गर लाइव्ह स्ट्रिमींगद्वारे जगासमोर आणला आहे. हा बर्गर प्रसिद्ध चेन मॅकडॉनल्डचा आहे.
२००९ मध्ये बंद झाले होते रेस्टॉरन्ट
मॅकडॉनल्डने २००९ मध्ये आइसलॅंडमधील २ रेस्टॉरन्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. एका व्यक्तीने ३१ ऑक्टोबर २०१९ ला रेस्टॉरन्टची शेवटची ऑर्डर रिसिव्ह केली होती. या व्यक्तीने एक हॅमबर्गर आणि एक फ्रेन्च फ्राइज ऑर्डर केलं होतं. या व्यक्तीचं नाव आहे Hjortur Smarason.
बर्गरचं लाइव्ह स्ट्रिमिंग
खास बाब ही आहे की, १० वर्ष जुना बर्गर आणि फ्रेन्च फ्राइज आजही एक-दोन दिवस जुना वाटतो. दक्षिण आइसलॅंडच्या Snotra House नावाच्या एका हॉस्टेलमध्ये हा बर्गर ठेवण्यात आलाय. ग्लास कॅबिनेटमध्ये ठेवलेला हा बर्गर लाखो लोक लाइव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून बघत आहेत. दररोज ४ लाख लोक हे लाइव्ह बघत आहेत.
यासाठी घेतला होता बर्गर..
हा बर्गर विकत घेणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, 'मी असं ऐकलं होतं की, मॅकडॉनल्डचे बर्गर कधीच डीकंपोज होत नाहीत. मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं.'. त्यांनी आधी हा बर्गर गॅरेजमध्ये ठेवला होता. नंतर त्यांनी आइसलॅंड म्युझिअमला दिला होता. नंतर एका हॉटेलला देण्यात आला होता.
मॅकडॉनल्डने २०१३ मध्ये यावर स्पष्टीकरण दिलं होतं की, जर योग्य वातावरणात त्यांचा बर्गर ठेवला गेला तर तो सडत नाही. आइसलॅंड युनिव्हर्सिटीमध्ये फूड सायन्सचे ब्योर्न अडलबोर्जसन म्हणाले की, 'जर कोणतंही खाद्य पदार्थ ओलाव्याशिवाय ठेवलं गेलं तर तो केवळ सुकेल, सडणार नाही'.