अतूट नातं! 102 वर्षीय पतीने हॉस्पिटलमध्ये पत्नीला दिलं सरप्राईज; Video पाहून व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 02:53 PM2023-05-06T14:53:43+5:302023-05-06T14:54:42+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्याची खूप चर्चा रंगली आहे. 

102 year old flowers wife hospital viral video emotional | अतूट नातं! 102 वर्षीय पतीने हॉस्पिटलमध्ये पत्नीला दिलं सरप्राईज; Video पाहून व्हाल भावूक

अतूट नातं! 102 वर्षीय पतीने हॉस्पिटलमध्ये पत्नीला दिलं सरप्राईज; Video पाहून व्हाल भावूक

googlenewsNext

आयुष्यात प्रत्येकाला अशा जीवनसाथीची गरज असते जी व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करते. गिफ्ट देणं आणि एकमेकांना स्पेशल फिल करून देणं रिलेशनशिपमध्ये खूप महत्वाचं आहे. पती-पत्नी म्हातारपणात एकमेकांना नक्कीच साथ देतात, पण सरप्राईज देणं हे सामान्य नाही. अशा परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्याची खूप चर्चा रंगली आहे. 

पत्नीला पुष्पगुच्छ देऊन किस केलं

गुड न्यूज मूव्हमेंटने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 102 वर्षीय व्यक्ती आपल्या आजारी पत्नीची रुग्णालयात भेट घेत आहे. त्यांच्या हातात पुष्पगुच्छ आहे आणि ते आपल्या पत्नीच्या हातात देतात आणि किस करतात. वयामुळे या व्यक्तीला चालताना देखील त्रास होत आहे. पत्नीसाठी ते हे करतात. नवऱ्याच्या हातातला पुष्पगुच्छ पाहून पत्नीला खूप आनंद होतो. 

व्हिडीओ पाहून लोक भावूक

व्हिडोओच्या कॅप्शनमध्ये "102 वर्षांचा नवरा त्याच्या लव्ह ऑफ लाईफसाठी फुलं घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला" असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेलं नाही.  शेअर केल्यापासून, हा व्हिडीओ ट्विटरवर 18,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि ते रिट्विट करत आहेत आणि त्यावर सुंदर कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होत आहेत.

यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या आजारी पत्नीची ट्रेनमध्ये काळजी घेताना दिसत होता. इंडियन आयडॉल 5 चे उपविजेते राकेश मैनी यांनी तो व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये पती आपल्या पत्नीला हाताने खाऊ घालत होता. वृद्ध पती-पत्नीचा हा क्यूट व्हिडीओ लोकांना खूप आवडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 102 year old flowers wife hospital viral video emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.