लय भारी! पहिलवानालाही घाम फुटेल असा पराक्रम केलाय ११ वर्षाच्या मुलाने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 05:40 PM2020-01-02T17:40:12+5:302020-01-02T17:41:22+5:30
रशियातील मॉस्कोमध्ये सगळ्यात स्ट्रॉग म्हणून ओळखला जात असलेल्या टिमोफे क्लेवेकिन याने १०० किलोचे वजन उचलेले आहे.
रशियातील मॉस्कोमध्ये सगळ्यात स्ट्रॉग म्हणून ओळखला जात असलेल्या टिमोफे क्लेवेकिन याने १०० किलोचे वजन उचलेले आहे. हा मुलगा फक्त ११ वर्षांचा आहे. हा मुलगा ६ वर्षाचा असल्यापासून वेटलिफ्टिंगचा सराव करत आहे. हा सराव त्याच्या ट्रेनर असलेल्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. आता हा राष्ट्रीय रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.
या मुलाचे वडील ज्यांना जीमला जाऊन बॉडी बनवण्याचा शौक आहे. अशा मुलांना ट्रेनिंग देत होते. यांना पाहूनच या मुलाला प्रेरणा मिळाली. पण त्याचा आईचा या गोष्टीसाठी विरोध होता.
सहा वर्षापूर्वी पहील्यांदाच टिमोफे ने एका स्थानीक स्पर्धेत भाग घेतला होता. आणि त्याने ५५ किलो वजन उचलण्याचा विक्रम केला. त्याने या आधीही वेट लिफ्टींगच्या चॅम्पियनशीपमध्ये सहभाग घेतला होता.
त्याच्या वडीलांच्यामते टिमोफेची खासीयत ही आहे की त्याला चॅम्पियनशीपसाठी खूप मेहनत करावी लागेल हे तो जाणतो. तो आठवड्यातून ३ ते ४ दिवस जिममध्ये व्यायाम करतो. त्याची आई आणि चाईल्ड डेव्हलपमेंट चे तज्ञांच्या म्हणण्यानूसार या ट्रेनिंगचा त्याच्या आरोग्यावर घातक परीणाम होऊ शकतो. यामुळे त्याचे गुडघे आणि कमरेच्या हाडांवर परीणाम होऊ शकतो. परंतू त्याच्या वडीलांचं म्हणणं असं आहे की मी त्याचा वडील असल्यामुळे ही साधना करत असताना त्याच्या आरोग्याची काळजी घेणं माझ कर्तव्य आहे.