शाब्बास! आठवीच्या मुलाचा अविष्कार पाहून व्हाल चकीत; रेल्वेमंत्रालयानेही केला कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 05:12 PM2020-06-26T17:12:18+5:302020-06-26T18:04:47+5:30
या मुलाने फक्त कागदाचा वापर करून रेल्वेगाडी तयार केली आहे. ही रेल्वे गाडी पाहून कोणीही आकर्षित होईल.
कोरोनाच्या काळात तुम्ही लहानमुलांच्या अनेक करामती पाहिल्या असतील. केरळच्या एका मुलाचे चक्क रेल्वेमंत्रालयाने कौतुक केले आहे. विशेष म्हणजे हा मुलगा फक्त १२ वर्षांचा आहे. सध्या सोशल मीडियावर या चिमुरड्याची चांगलीच चर्चा आहे. केरळच्या अद्वैत कृष्णा नावाच्या मुलाने फक्त कागदाचा वापर करून रेल्वेगाडी तयार केली आहे. ही रेल्वे गाडी पाहून कोणीही आकर्षित होईल.
हे ट्रेनचं मॉडेल आकर्षक आणि कलात्मक असल्यामुळे या मुलाच्या प्रयत्नांना रेल्वेमंत्रालयानेही दाद दिली आहे. भारतीय रेल्वेने या मुलाच्या कलात्मकतेचं सोशल मीडियावर कौतुक केले आहे. वर्तमानपत्राच्या ५० पानांपासून ही रेल्वेगाडी तयार केली आहे. म्हणून आठवीच्या मुलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या चिमुरड्याच्या ट्रेनसोबतच्या फोटोला ६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर ४०० लोकांनी शेअर सुद्धा केले आहे.
Master Adwaith Krishna, a 12 year old rail enthusiast from Thrissur, Kerala has unleashed his creative streak and has made a captivating train model using newspapers.
— Ministry of Railways (@RailMinIndia) June 25, 2020
His near perfection train replica took him just 3 days. pic.twitter.com/H99TeMIOCs
अद्वैत कृष्णाने हे रेल्वेचे मॉडेल अवघ्या तीन दिवसात तयार केलं आहे. रेल्वेमंत्रालयाने रेल्वे गाडीच्या मॉडेलचा व्हिडीओ शेअर करत कौतुक केले आहे. ट्विटरवर या व्हिडीओला २९ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज् आणि १९६ रिट्विट्स मिळाले आहेत.
१० वर्षांच्या चिमुरडीची हुशारी पाहून ठोकाल सलाम! अपंग असूनही एका हाताने इतरांसाठी शिवतेय मास्क
चॅलेन्ज! या फोटोत लपली आहे पाल; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?