12th Fail: कठीण काळातील सोबती ते...! IPS मनोज शर्मा यांच्या जुन्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 05:16 PM2024-01-10T17:16:19+5:302024-01-10T17:18:57+5:30
१२वी फेल चित्रपट अनुराग पाठकच्या 12th Fail पुस्तकावर आधारित आहे.
12th fail movie: संघर्षमय काळात प्रेयसीने दिलेली साथ आणि त्यातून मिळालेलं यश म्हणजे IPS अधिकारी मनोज शर्मा यांची प्रेरणादायी कहाणी. त्यांच्या जीवनावर आधारित बनलेला 12th फेल हा चित्रपट चाहत्यांना भुरळ घालत आहे. आयपीएस मनोज शर्मा (IPS Manoj Sharma) यांच्या जीवनावर आधारित 12th Fail या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey) झळकला असून, त्याच्या ऑपोझीट मेधा शंकर (Medha Shankar) हिने साकारलेली श्रद्धा जोशीची भूमिका प्रेक्षकांना भावली.
मेधाने साकारलेल्या दमदार सर्पोटिव्ह पार्टनरच्या भूमिकेमुळे ती रात्रोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. शिवाय निखळ सौंदर्यामुळे नेटकरी तिला आज नॅशनल क्रश (National Crush) असे संबोधत आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चर्चा रंगली असताना आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांनी पत्नी श्रद्धासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहले की, लग्नानंतरच्या काही दिवसांचा फोटो आज मिळाला. मनोज शर्मा यांची कहाणी म्हणजे कठीण काळातील सोबती ते सुवर्ण क्षणांचे साक्षीदार अशीच काहीशी आहे.
शादी के कुछ दिन बाद का एक फ़ोटो मिला आज
— Manoj Sharma (@ManojSharmaIPS) January 10, 2024
….🙏 pic.twitter.com/kPqSsbcWt9
फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला. अनेकांनी या फोटोचा त्यांच्या स्वप्नांशी संबंध जोडला तर काहींना विक्रांत मेसीचा चित्रपट आठवला. एका युजरने या फोटोवर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, तुम्ही खूप नशीबवान आहात की आज संपूर्ण देश तुमची प्रेमकथा पाहत आहे आणि त्याचे कौतुक करत आहे.
१२वी फेलची चित्रपटाची कहाणी
१२वी फेल चित्रपट अनुराग पाठकच्या याच नावावरील पुस्तकावर आधारीत आहे. यात विक्रांतसोबत मेधा शंकर, अनंत वी जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशु चटर्जी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची कथा रेखाटण्यात आली आहे, जे १२वीत फेल होते. त्यानंतर त्यांनी वेगळीवेगळ्या ठिकाणी काम केले आणि सोबत युपीएससीच्या तयारीला लागले आणि यशाचे शिखर गाठले.