VIDEO:१४ तबला वादकांनी सादर केले अप्रतिम शिव तांडव; व्हिडीओने जिंकली अनेकांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:36 PM2022-08-01T12:36:01+5:302022-08-01T12:37:35+5:30
सध्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे.
नवी दिल्ली : सध्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे खूप महत्त्व आहे, हा महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो. या महिन्यात महादेवाचे भक्त पूजा, उपासना करून आराधना करत असतात. या महिन्यात भक्तमंडळी जलाभिषेक, रुद्राभिषेक, भजन-कीर्तन आणि भक्तीमध्ये तल्लीन होत असतात. सध्या अशाच एका भजनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कारण इथे १४ तबला वादकांनी अप्रतिम शिव तांडव (Shiv Tandav on Tabor Performence)सादर करून अनेकांची मने जिंकली आहेत.
जुना व्हिडीओ चर्चेत
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शिव तांडवाची एक अशी व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला ऐकून तुमच्या देखील अंगावर शहारे येतील. सोशल मीडियावरील युजर्स या व्हिडीओतील लोकांचे खूप कौतुक करत आहे. विशेष बाब म्हणजे १४ तबला वादकांनी एका सुरात शिव तांडव सादर केले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ गुजरातमधील आहे, जिथे तबला गुरू भार्गव दास जानी यांच्यासोबत त्यांचे १४ शिष्य शिव तांडव सादर करत आहेत. व्हिडीओत २ लहान मुले देखील तबला वाजवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जुना आहे मात्र सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे.
अप्रतिम शिव तांडव सादर केलेल्या या व्हिडीओला 'इंडियन म्यूजिक सोल' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "ॐ नमः शिवाय" काही सोशल मीडियावरील युजर्संनी व्हिडीओचे खूप कौतुक केले आहे. आमच्या तर अंगावर शहारेच आले असे काहींचे म्हणणे आहे.