नयणरम्य दृष्य! 20 सिंह एकाचवेळी नदीकाठी जमले, Video पाहून तुम्हीही चकीत व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:06 PM2023-07-06T15:06:43+5:302023-07-06T15:07:48+5:30
MalaMala Game Reserve: हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
20 Lions Together Drinking Water Video : जगभरातील जंगलांमध्ये अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. सोशल मीडियावरही दररोज वन्यजीवांचे अनेक चकीत करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. वन्यजीव छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात अशाच प्रकारचे चकीत करणारे क्षण कैद होतात. सध्या असाच एक चकीत करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक-दोन नव्हे तर चक्क 20 सिंह एकाचवेळी पाणी पिताना दिसत आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील मलामाला गेम रिझर्व्हमधील (MalaMala Game Reserve) हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एकाच वेळी 20 सिंह नदीकाठी आपली तहान भागवताना पाहून नेटिझन्सही थक्क झाले आहेत. हे अत्यंत दुर्मिळ दृश्य नदाव ओसेंड्रिव्हरने आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. नदाव हे LatestSightings.com चे संस्थापक आणि CEO आहेत. मलामाला गेम रिझर्व्हमधील सफारीदरम्यान त्यांना हा सिंहांचा कळप पाणी पिताना दिसला.
नदाव यांनी या दृष्याबाबत सांगितले की, आम्ही सफारी आटोपून परतत असताना नदीजवळ वन्य प्राणी दिसले. आम्ही त्यांना पाहत होतो, तेवढ्यात सिंहांचा कळप आला आणि तहान भागवू लागला. या कळपात दोन-चार नव्हते तर एकूण 20 सिंह होते. हा व्हिडिओ लेटेस्ट साईटिंग्जच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. ज्यावर आतापर्यंत सुमारे 5 लाख व्ह्यूज आले आहेत.