२० वर्षीय तरूण चालवतो होता Lamborghini कार, गंभीर अपघातात कारचे झाले तुकडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 15:53 IST2019-05-01T15:49:02+5:302019-05-01T15:53:19+5:30
कार असो वा बाईक गाडीवर जरा जरी स्क्रॅच आला तर मालकाच्या मनात धडकी भरते. रोजरोज डोळ्यासमोर येणारा हा स्क्रॅच पाहून मालकाचं मन दुखत असतं.

२० वर्षीय तरूण चालवतो होता Lamborghini कार, गंभीर अपघातात कारचे झाले तुकडे!
कार असो वा बाईक गाडीवर जरा जरी स्क्रॅच आला तर मालकाच्या मनात धडकी भरते. रोजरोज डोळ्यासमोर येणारा हा स्क्रॅच पाहून मालकाचं मन दुखत असतं. आता जरा विचार करा की, जर तुमची गाडी कोट्यवधी रूपयांची असेल आणि तिचे दोन तुकडे झाले तर तुम्हाला कसं वाटेल? इजिप्तमधील अशीच एक घटना समोर आली आहे. इथे लॅम्बोर्गिनी कारचा इतका गंभीर अपघात झाला की, कारचे दोन तुकडे झाले.
रिपोर्ट्सनुसार, हा अपघात इजिप्तची राजधानी काहिराच्या Al Suez च्या रोडवर झाला. ही पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी २० वर्षीय तरूण चालवत होता. पण अचानक कारवरील त्याच नियंत्रण सुटलं आणि गंभीर अपघात झाला.
असे सांगितले जात आहे की, हा अपघात भर ट्रॅफिकमध्ये रस्त्याच्या मधोमध झाला. अपघात इतका गंभीर होता की, २ कोटी रूपयांच्या कारचे तुकडे तुकडे झाले. सुदैवाने इतक्या गंभीर अपघातातून २० वर्षीय तरूणाचा जीव वाचला. मात्र त्याला काही गंभीर जखमा झाल्या आहेत.
येथील रस्त्यांवर कार चालकांसाठी वेगाची मर्यादा लिहिलेली असते. तरी सुद्धा अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करत वेगाने गाडी चालवतात. ज्याचा परिणाम अशाप्रकारे बघायला मिळतो.