लय भारी! उन्हाळात राबणाऱ्या जवानासाठी बनवली छत्री; पाहा 'या' छत्रीची खासियत न्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 02:41 PM2020-05-17T14:41:52+5:302020-05-17T14:43:43+5:30
सध्या सोशल मीडीयावर एका जवानाच्या छत्रीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. गोरगरीबांसाठी अन्नादाता तर कधी देवदूत बनून काम करत आहेत. कारण कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाला सुद्धा मदतीचा हात देण्यासाठी समाजातील काहीजण पुढे येत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जवानाच्या छत्रीबाबत सांगणार आहोत. सध्या सोशल मीडीयावर एका जवानाच्या छत्रीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
This ❤️
— Kumar Manish #StayAtHome 🏡 (@kumarmanish9) May 15, 2020
Adib Mansuri, 23, mechanical engineering student frm Juhapura in #Ahmedabad developed a solar-umbrella for @AhmedabadPolice
deployed at the ‘Quarantine Cluster Areas’. It has solar mini fan to beat heat,low-energy light & a mobile charging point. #grato@liveahmedabad11pic.twitter.com/uyHGvwwj4P
सोशल मीडियावर २३ वर्षीय विद्यार्थांचं खूप कौतुक होत आहे. हा मुलगा अहमदाबादमधील जुहापुरा येथे मेकॅनिकल इंजिनीयरिंगचं प्रक्षिक्षण घेत आहे. या मुलाने रणरणत्या उन्हात काम करत असलेल्या जवानासाठी छत्री तयार केली आहे. याला 'सोलार अम्ब्रेला' असं नाव देण्यात आलं आहे. या छत्रीत एक पंखा, लाईट आणि चार्जिंग पॉईंट आहेत.
ट्वीटरवर हा फोटो मनीषकुमार यांनी शेअर केला आहे. ही छत्री अहमदाबाद येथील उजाला सर्कल येथे लावण्यात आली आहे. अजून पाच अशा प्रकारच्या छत्र्या तयार करण्यात आल्या आहेत. आबिद एलजी इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी चे विद्यार्थी या कामात मदत करत आहेत. पोलीस कर्माचाऱ्यांनी या छत्र्या तयार करत असलेल्या विद्यार्थांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
('या' पाळीव प्राण्यापासून पसरू शकतो कोरोनाचा विषाणू; लांब राहाल तरच निरोगी राहाल)
(कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ)