हजारो वर्षापूर्वी सुरू झाला फ्लश टॉयलेटचा वापर; 'या' देशात उत्खननात सापडले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:38 PM2023-02-27T13:38:51+5:302023-02-27T13:43:22+5:30
रोजच्या वापरातील टॉयलेटचा शोध कधी लागला तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न अनेकांना पडत असतो. आता या टॉयलेटमध्ये प्रकार आले आहेत.
रोजच्या वापरातील टॉयलेटचा शोध कधी लागला तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न अनेकांना पडत असतो. आता या टॉयलेटमध्ये प्रकार आले आहेत. यात वेस्टर्न टॉयलेटचाही प्रकार समोर आला आहे. यात फ्लश करता येणारं टॉयलेट पहिल्यांदा कधी सुरू झाले? या टॉयलेटचा वापर फार पूर्वीपासून होता अशी माहिती आता समोर आली आहे.
चीनमध्ये एका उत्खननात २४०० वर्षे जुने फ्लश टॉयलेट सापडल्याचे समोर आले आहे, होय २४०० वर्षेपूर्वीही फ्लश टॉयलेटचा वापर केला जात होता. हे टॉयलेट चीनच्या किन राजवंशातील राजे वापरत होते. युयांग नावाच्या ठिकाणी उत्खननातून राजवाड्याचे अवशेष सापडले आहेत. युयांगच्या उत्खननाचे काम २०१२ मध्ये सुरू झाले.
तज्ज्ञांच्या मते, किंग झियाओगोंग यांनी युएयांगमधील हे टॉयलेट वापरले असावे. झियाओगॉन्ग 381 B.C. पासून ३२४ ईसा पूर्व. पर्यंत राज्य केले मात्र, खोदकामात या फ्लश करण्यायोग्य टॉयलेटपैकी निम्मेच टॉयलेट सापडले नाही, त्यामुळे अनेक बाबींची पूर्ण खात्री करणे शक्य झालेले नाही. पण हे निश्चित आहे की चीनमधील फ्लशिंग टॉयलेटचा हा आतापर्यंतचा सर्वात जुना अवशेष आहे. आतापर्यंत असे मानले जाते की फ्लश करण्यायोग्य टॉयलेटचा शोध सर जॉन हॅरिंग्टन यांनी १६ व्या शतकात लावला होता.
इंडियन की वेस्टर्न, कोणतं टॉयलेट आहे बेस्ट? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
इंडियन की वेस्टर्न, कोणतं टॉयलेट आहे बेस्ट?
आजकाल आपल्याकडे वेस्टर्न टॉयलेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात किंवा ग्रामीण भागातही वेस्टर्न टॉयलेट वापरले जात आहेत. पण, या टॉयलेटचे फायदा आहेत की तोटे हे कुणालाच नाही.वेस्टर्न टॉयलेटमुळे आपल्या शरिरात काही परिणाम होतात की नाही हे माहित असणे गरजेचे आहे. वेस्टर्न सीट आरामदायी आहे, पण देसी टॉयलेटमुळे पूर्ण शरिराची मूव्हमेंट होते. याशिवाय, वेस्टर्न टॉयलेटमध्ये संसर्गाचा धोकाही जास्त असतो कारण ते वापरताना संपूर्ण त्वचेचा संपर्क येतो.
एका रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे. जेव्हा एखादा व्यक्ती देसी टॉयलेट वापरतो तेव्हा त्या व्यक्तीची पूर्ण बॉडीची हालचाल होते. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर दबाव असतो, पण वेस्टर्न टॉयलेट आरामदायी असते, त्यामुळे आपण आजारी पडू शकतो.
देसी टॉयलेट सीटवर फ्रेश होण्यासाठी देखील कमी वेळ लागतो. पोट साफ होण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागतात, तर वेस्टर्न टॉयलेटसाठी 5 ते 7 मिनिटे लागतात.देसी टॉयलेट वापरल्याने पोट आणि पचनसंस्थेवर दबाव येतो. त्यामुळे पोट लवकर साफ होते.