Video: जेव्हा एकत्र समोरा-समोर आले ३ खतरनाक किंग कोब्रा, नजारा पाहून उडेल थरकाप...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:26 PM2021-12-17T12:26:41+5:302021-12-17T12:27:24+5:30

Three King Cobra Video : नक्कीच हा नजारा मनात धडकी भरवणारा आहे. कारण असा नजारा  याआधी कधी कुणाला बघायला मिळाला नसेल.

3 King cobra found together video goes viral on social media | Video: जेव्हा एकत्र समोरा-समोर आले ३ खतरनाक किंग कोब्रा, नजारा पाहून उडेल थरकाप...

Video: जेव्हा एकत्र समोरा-समोर आले ३ खतरनाक किंग कोब्रा, नजारा पाहून उडेल थरकाप...

Next

सोशल मीडिया प्राण्यांचे एकापेक्षा एक भारी आणि आश्चर्याचा धक्का देणारे व्हिडीओ शेअर होत असतात. सापांचे तर अंगावर शहारे आणणारे तर कधी धडकी भरवणारे व्हिडीओही समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी तीन किंग कोब्रा एका झाडावर बसलेला फोटो व्हायरल झाला होता. आता पुन्हा तीन किंग क्रोबांचं एक व्हिडीओ व्हायरल (Three King Cobra Video) झाला आहे. यात तीन किंग कोब्रा आमने-सामने आले आहेत. नक्कीच हा नजारा मनात धडकी भरवणारा आहे. कारण असा नजारा  याआधी कधी कुणाला बघायला मिळाला नसेल. काही लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले तर काही लोकांना मजाही येत आहे.

सामान्यपणे सापांना पाहिल्यावर लोकांना घाम फुटतो. अशात जर खतरनाक आणि विशाल साप समोर आला तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक दोन नाही तर तीन किंग क्रोबा समोरासमोर आले आहेत. व्हिडीओ पाहून असं वाटतं हा एखाद्या सिनेमातील थरारक सीन असेल. पण सीन नसून खरा व्हिडीओ आहे. त्यांना पाहून तर असं वाटतं की, ते आता एकमेकांवर हल्ला करतील. पण तसं काही होत नाही.

तिघांमध्ये पुढे काय होतं हे या व्हिडीओत दाखवण्यात आलेलं नाही. पण कल्पना करू शकता की, नजारा कसा असेल? हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही, पण व्हिडीओ 'helicopter_yatra' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. लोक हा व्हिडीओ बघून हैराण झाले आहेत आणि व्हिडीओखाली भरभरून कमेंट्सही करत आहेत.
 

Web Title: 3 King cobra found together video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.