१ BHK साठी ४५ हजार रुपये भाडे, ते ही चाळीत... Video: कुठे सुरु झाले, कुठे संपले... नेटकरी खवळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 10:18 AM2024-10-05T10:18:18+5:302024-10-05T10:18:47+5:30

1bhk Flat rent in Mumbai: व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेक लोकांनी व्यक्त होत संबंधित व्यक्तीची खिल्ली उडवली आहे, तसेच रागदेखील व्यक्त केला आहे. 

45,000 rupees rent for 1 BHK in mumbai, it's in this chaul... Where did it start, where did it end... The netizens were shocked. | १ BHK साठी ४५ हजार रुपये भाडे, ते ही चाळीत... Video: कुठे सुरु झाले, कुठे संपले... नेटकरी खवळले

१ BHK साठी ४५ हजार रुपये भाडे, ते ही चाळीत... Video: कुठे सुरु झाले, कुठे संपले... नेटकरी खवळले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतल्या एका चाळकऱ्याने आपले घर भाड्याने देण्यासाठी त्याच्या खोलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आता त्याच्यावरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. घर चाळीतले असेल तरी छोटेखानी वन-बीएच-के घर आहे. मात्र, त्या घरासाठी त्याने प्रति महिना ४५ हजार रुपयांचे भाडे मागितल्याने सोशल मीडियावर अनेक जण संबंधित व्यक्तीवर टीका करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ माटुंगा येथील असल्याची माहिती असून, या घराचे आकारमान लहान आहे. बेडरूममध्ये जेमतेम बेड सामावला जाऊ शकतो, तर बाथरूमदेखील लहान आहे. याचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेक लोकांनी व्यक्त होत संबंधित व्यक्तीची खिल्ली उडवली आहे, तसेच रागदेखील व्यक्त केला आहे. 


महिन्याला ४५ हजार रुपयांचे भाडे 
द्यायचे तर पार्किंग आहे का, किंवा चाळीतल्या खोलीसाठी एवढे भाडे आकारायला लाज वाटत नाही का, अशादेखील संतप्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: 45,000 rupees rent for 1 BHK in mumbai, it's in this chaul... Where did it start, where did it end... The netizens were shocked.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.