Pregnant dsp : सलाम! रणरणत्या उन्हात गर्भवती महिला DSP कर्तव्यावर हजर; अन् नियम मोडत लोक निघालेत फिरायला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 02:10 PM2021-04-20T14:10:25+5:302021-04-20T14:39:58+5:30
5 month pregnant dsp doing duty : स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनायोद्धे राब राब राबताना दिसून येत आहेत. असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसनं कहर केलेला पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच देशातील शासकीय यंत्रणा लॉकडाऊन राबवण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत आरोग्य व्यवस्था, प्रशासकिय यंत्रणांवर प्रचंड ताण आलेला दिसून येतो.
स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनायोद्धे राब राब राबताना दिसून येत आहेत. असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दंतेवाडा, छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू (5 month Pregnant DSP Shilpa Sahu doing her duty in on road at Chhattisgarh) यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तस्वीर दंतेवाड़ा DSP शिल्पा साहू की है
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 20, 2021
शिल्पा गर्भावस्था के दौरान भी चिलचिलाती धूप में अपनी टीम के साथ सड़कों पर मुस्तैदी से तैनात हैं और लोगों से लॉक डाउन का पालन करने की अपील कर रही हैं.#CGPolice#StayHomeStaySafepic.twitter.com/SIsZdAvuOW
लॉकडाऊनमध्ये दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू रस्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या लोकांना कोरोनाची तीव्रता समजावून सांगत आहेत. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील त्या करत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच या महिला पोलिसाच्या कर्तव्याला सलामही ठोकला आहे.
आयपीएस अधिकारी दिपांषु काब्रा यांनी गरोदरपणात कर्तव्य बजावणाऱ्या शिल्पा साहू यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शिल्पा यांनी लोकांना आवाहन केले की, आज आम्ही रस्त्यावर उभे आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहू शकाल. बोंबला! तिला कारागिरांना पाठवायचा होता तुटलेल्या छताचा फोटो; कॅमेरात काहीतरी भलतंच कैद झालं, अन् मग...
कोरोनाच्या कठीण काळात आपल्या गर्भातील बाळाची आणि सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, काहींनी मात्र, त्यांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी, काम करू नये म्हणत सुनावलं आहे. भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!