जबरदस्त! या ५८ वर्षांच्या बॉडीबिल्डरला आहे ३३ वर्षांचा मुलगा, फिटनेस पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:37 PM2021-04-13T19:37:13+5:302021-04-13T19:42:53+5:30
या वयात माणसांची रिटायर होण्याची तयारी सुरू असते, पण या माणसानं मात्र कमाल केली आहे.
वयानुसार प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. कोणी जास्त जाड होतं तर कोणी बारिक, जास्तीत जास्त लोक वाढत्या वयात जीवनशैलीशी निगडीत चुकांमुळे सुटत जातात. पण काही लोक स्वतःला नेहमीच मेंटेन करून ठेवतात. सोशल मीडियावर राहूल देव यांचा फोटो व्हायरल होत आहे. राहूल देव मन्हास यांची पर्सनॅलिटी काही प्रमाणात अशीच आहे. या वयात माणसांची रिटायर होण्याची तयारी सुरू असते, पण या माणसानं मात्र कमाल केली आहे.
राहूल देव मन्हास यांच्या मुलाचे वय ३३ वर्ष आहे. लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. जास्तीत जास्त लोकांना त्यांचे वय ३५ ते ४० दरम्यान असावं असं वाटत आहे. त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास २०० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आपले सुंदर, फिटनेसचे फोटो शेअर करून ते तरूणांना प्रोत्साहन देतात.
वयाच्या ५८ व्या वर्षीसुद्धा ते मेंस फिजिक्स खेळतात. त्यांनी इंस्टाग्राम बायोवर स्वतःला नेच्यूरल एथलीट असल्याचं सांगितले आहे. याशिवाय मिस्टर युनिव्हर्स 2019, मसल्स मैनिया फिजिक’ व ‘मिस्टर इंडिया 2 जिंकले आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशाच एका ७५ वर्षीय फीट आजोबांचा फोटो व्हायरल होत होता. हे आजोबा ७२ वर्षांचे असून मलेशियाचे रहिवासी आहेत. मलेशियन बॉडीबिल्डर ए. अरोकियासामी (A. Arokiasamy) या वयातही आपल्या व्यायामशाळेत दररोज वेटलिफ्टिंग (Weightlifting) करणं चुकवत नाहीत.
अत्यंत व्यस्त जीवनशैलीत त्यांनी हेल्दी (Healthy) राहणं त्यांनी पसंत केलं. कोरोना व्हायरसशी लढण्याचा हा सोपा मार्ग आहे. अरोकियासामी हे मूळचे भारतीय वंशाचे असून, तिथल्या अल्पसंख्याकांत त्यांचा समावेश होतो. शाळा सोडल्यानंतर अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डिंग (Bodybuilding) करायचं ठरवंल. विशेष म्हणजे मिस्टर युनिव्हर्स (Mr. Universe) या स्पर्धेत त्यांनी मलेशियाचं अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं होतं. १९८१ मध्ये फिलिपाइन्समध्ये झालेल्या आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं.
जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण......
मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेचा माजी विजेता आणि हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger) हा अरोकियासामींचा आदर्श आहे. कालांतराने अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डर होऊ इच्छिणाऱ्यांना वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यासाठी स्वतःची व्यायामशाळाही उघडली. त्याच्या व्यायामशाळेत नेहमीच पुरूषांची गर्दी असते. यासाठी ते फक्त एक डॉलर एवढं शुल्क घेतात.