...म्हणून रूसच्या या मुलीला जगभरातील फॅन्स म्हणतायत 'सर्वात क्यूट'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:47 PM2019-10-15T17:47:17+5:302019-10-15T17:49:32+5:30

अलीना यकूपोवा आता फक्त 6 वर्षांची असून ती 4 वर्षांची असल्यापासून मॉडलिंग करत आहे. या क्यूट मुलीचं इन्स्टाग्रामवर एक अकाउंट आहे.

6 year old russian child mode has been branded the most cute girl in the world by fans | ...म्हणून रूसच्या या मुलीला जगभरातील फॅन्स म्हणतायत 'सर्वात क्यूट'

...म्हणून रूसच्या या मुलीला जगभरातील फॅन्स म्हणतायत 'सर्वात क्यूट'

Next

अलीना यकूपोवा आता फक्त 6 वर्षांची असून ती 4 वर्षांची असल्यापासून मॉडलिंग करत आहे. या क्यूट मुलीचं इन्स्टाग्रामवर एक अकाउंट आहे. त्यावर तिचे जवळपास 22.1k फॉलोअर्स आहेत. खास गोष्ट म्हणजे, रूसमध्ये राहणाऱ्या या मुलीला तिचे चाहते 'जगातील सर्वात क्यूट मुलगी' म्हणून ओळखतात. 

अनेक प्रसिद्ध ब्रँड आणि मॅगझिन्ससाठी मॉडलिंग

अलीना अनेक फॅशन कॅम्पेनचा भाग आहे. यामध्ये मुलांच्या कपड्यांशी निगडीत प्रसिद्ध ब्रँड मोनालिसा किड्स आणि ग्लोरिया जीन्स यांसारख्या नावांचा समावेश आहे.

आपले सोनेरी केस आणि सुंदर स्माइलमुळे अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या चिमुकलीने प्रसिद्ध फॅशन मॅगझिन 'इनस्टाइल' आणि 'ग्राजिया'साठीही मॉडलिंग केलं आहे. 

फोटोंना मिळातात हजारो लाइक्स... 

इन्स्टाग्रामवर अलीनाचे फार सुंदर आणि क्यूट फोटो आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला हजारो लाइक्स मिळतात. तिच्या फॅन्समध्ये जर्मनी, कोस्टा रिका आणि कॅलिफोर्नियामधील यूजर्सचा समावेश आहे. 

ती फक्त क्यूट नाहीतर प्रोफेशनलदेखील आहे

अलीनाचे मॅनेजर रोमन कुखर सांगतात की, मागील काही वर्षांमध्ये अलीनाची फॅनफॉलोइंग फार वाढली आहे. ती आपल्या कामाबाबात फार प्रामाणिक आहे. एवढ्या लहान वयात फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिने धुमाकूळ घातला आहे. तसेच तिच्या काम करण्याची पद्धतही फार प्रोफेशनल आहे. 

रोमन पुढे बोलताना सांगतात की, 'अनेक लोक तिच्या सौंदर्यावर आणि क्यूटनेसवर फिदा आहेत. परंतु, तिच्या यशामागे फार मेहनतही आहे. ती एखाद्या सुंदर राजकुमारीप्रमाणे आहे. 

Web Title: 6 year old russian child mode has been branded the most cute girl in the world by fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.