Remarrying : वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:15 PM2021-04-28T17:15:38+5:302021-04-28T17:20:01+5:30
71 year old father remarrying : या आजोबांच्या मुलीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
एका मुलीनं आपल्या वयोवृद्ध वडीलांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर ५ वर्ष या आजोबांनी विधूराप्रमाणे घालवली. आता ७१ वर्ष वयात या आजोबांनी एका विधवेसह पुन्हा लग्न केलं आहे. या आजोबांच्या मुलीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आतापर्यंत २४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स तर २ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी या आजोबांवर टिका केली आहे तर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. 'देव तुमच्या आई वडीलांना सुख, शांती आणि आनंद देवो.' असं एका युजरनं म्हटलं आहे.
@Aditi_RR यांनी हा फोटो ट्विट करताना कॅप्शन दिलं आहे की, 'हे माझे वडील आहेत त्याचे वय ७१ वर्ष आहे. त्यांनी ५ वर्षापर्यंत विधूर राहिल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला नेहमीच असं वाटायचं की त्यांनी दुसरं लग्न करायला हवं. कारण कोणीही एकटं जीवन जगू शकत नाही.'
कोविड झाल्यानंतरही रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसला तरूण ; IAS अधिकारी म्हणाले.....
पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा खूप पेच निर्माण करणारा प्रसंग आहे. आपल्याकडे पुर्नविवाहाबद्दल नियम व्यवस्थित नाहीत. आता समाज त्यांना स्वीकारणार की नाही याबाबत आम्हालाही माहित नाही. तसंच आम्हाला हे सुद्धा माहिती नाही की, वाढत्या वयात ते एकमेकांना कसं स्वीकारतील. यावर सोशल मीडिया युजर्सनी आपापल्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत.
1)
First of all stop worrying about the so called society. Everyone has enough problems to worry about and need to live for ourselves. It’s not society that defines our lives and it will not support or care for you at difficult times. Care for the family and friends 👍All the best
— Raghav Venkatesan (@RaghavVenkates6) April 27, 2021
2)
This should be normalised. It’s perfectly fine for old people to seek companionship. https://t.co/YMR2dpjePX
— a muse (@_a_muse) April 27, 2021