बाबो! 19 वर्षांचा मुलगा म्हणतो, "माझी 76 वर्षांची गर्लफ्रेंड आहे प्रेग्नंट"; सत्य समजताच व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:11 IST2023-02-09T16:11:17+5:302023-02-09T16:11:45+5:30

जोसेफ 19 वर्षांचा असून तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

76 years old lady relationship with teen boy pregnancy news shocked | बाबो! 19 वर्षांचा मुलगा म्हणतो, "माझी 76 वर्षांची गर्लफ्रेंड आहे प्रेग्नंट"; सत्य समजताच व्हाल हैराण

फोटो - आजतक

एका 19 वर्षांच्या मुलाने सोशल मीडियावर असा दावा केला ज्यामुळे लोक देखील हैराण झाले आहेत. मुलाने सांगितले की, लवकरच त्याची 76 वर्षीय गर्लफ्रेंड मुलाला जन्म देणार आहे. त्याने महिलेसोबतचा फोटोही शेअर केला आहे. मात्र, नंतर त्याने स्वतः त्यामागचे सत्य सांगितले. पण आता युजर्स त्याच्या पोस्टवर संताप व्यक्त करत असून खूप टीकाही करत आहेत.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या मुलाचे नाव जोसेफ डी'अन्ना असं आहे. इटलीमध्ये राहणारा जोसेफ 19 वर्षांचा असून तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अलीकडेच त्याने एक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत.

व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड त्याच्यापेक्षा 57 वर्षांनी मोठी आहे आणि आता ती प्रेग्नेंट आहे. ती लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे. जोसेफने तिचं मिलिना गट्टाचे असं नाव सांगितलं. मिलिना 76 वर्षांची आहे. नंतर जोसेफने भलतंच सत्य सांगितलं. मात्र व्हिडीओ समोर आल्यानंतर युजर्स चांगलेच संतापले. 

2022 मध्ये हे दोघे पहिल्यांदा व्हायरल झाले होते, जेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. त्यावेळीही ही जोडी ट्रोलच्या निशाण्यावर आली होती. त्यानंतर लोकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले. अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. ट्रोलला न जुमानता या जोडप्याने आता प्रेग्नेंसीशी संबंधित बातम्या शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.

जोसेफने सांगितलं सत्य 

जोसेफने अलीकडेच Jam Press त्याच्या व्हायरल व्हिडिओबद्दल सांगितले की त्यांचे नाते खोटे आहे. खरंतर मिलिना त्याची आजी आहे. जोसेफ म्हणाला - सुरुवातीला विनोद म्हणून तिच्यासोबत एक क्लिप अपलोड केली. पण ते व्हायरल झाले. त्यामुळेच पुढे असंच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: 76 years old lady relationship with teen boy pregnancy news shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.