कोट्यवधींची प्रॉपर्टी असलेली महिला मागते भीक, दिवसाची कमाई वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:40 PM2018-11-07T13:40:06+5:302018-11-07T13:45:54+5:30

चीनच्या हॅंग्जो-इस्ट रेल्वे स्टेशनवर एक घोषणा सतत काही दिवसांपासून सतत ऐकायला मिळत आहे.

79-Year-Old Beggar in China Ousted as Wealthy Grandma Who Just Enjoys Begging | कोट्यवधींची प्रॉपर्टी असलेली महिला मागते भीक, दिवसाची कमाई वाचून व्हाल हैराण!

कोट्यवधींची प्रॉपर्टी असलेली महिला मागते भीक, दिवसाची कमाई वाचून व्हाल हैराण!

चीनच्या हॅंग्जो-इस्ट रेल्वे स्टेशनवर एक घोषणा सतत काही दिवसांपासून सतत ऐकायला मिळत आहे. यात प्रवाशांना सांगितलं जातंय की, त्यांना एक म्हातारी महिला दिसेल...तिच्या बोलण्यात येऊ नका आणि तिला भीकही देऊ नका. आता अशाप्रकारची घोषणा करण्यात आल्यावर सर्वांना प्रश्न पडणारच ना! पण या महिलेचा किस्सा फारच इंटरेस्टींग आहे. ज्या महिलेला भीक न देण्याची घोषणा केली जात आहे ती ७९ वर्षांची आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला गरीब नसून चांगलीच श्रीमंत आहे. पण तरीही ती भीक मागते. 

५ मजली इमारतीत राहते ही आजी

गेल्याकाही दिवसांपूर्वी चीनमधील वृत्तपत्रांमध्ये ही महिला चर्चेत होती. असे सांगितले जाते की, ही महिला आजूबाजूने जाणाऱ्या लोकांशी भावूक गोष्टी करते आणि त्यांना भीक मागते. पण सत्य हे आहे की, ती एका पाच मजली इमारतीत राहते. इतकेच नाही तर तिच्या अनेक प्रॉपर्टी असून त्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. ज्यातून त्यांची चांगलीच कमाई होते. 

मुलाने सांगितली सत्य

या महिलेच्या मुलाने एका वृत्तपत्राला माहिती दिली की, 'सत्य हे आहे की, आम्ही घरचे चांगले श्रीमंत आहोत. आमचा स्वत:चा बिझनेस आहे. अनेक प्रॉपर्टी भाड्याने दिल्या आहेत. मी स्वत: एक फॅक्टरी चालवते. पण माझ्या आईला भीक मागण्याची सवय लागली आहे. आम्ही अनेकदा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नाही'.

सोशल मीडियातून आवाहन

त्याने पुढे सांगितले की, 'माझ्या आईची स्वत:ची अनेक बॅंकांमध्ये खाती आहेत. आम्ही अनेकदा समजावूनही ती ऐकली नाही. त्यामुळे आम्ही तिचे फोटो सोशल मीडियात शेअर केलेत आणि लोकांना आवाहन केले की, या महिलेच्या बोलण्याला फसू नका आणि तिला भीकही देऊ नका. पण सर्व प्रयत्ने अपयशी ठरले. आता रेल्वे स्टेशनमधून याबाबत मदत केली जात आहे'.

अबब! किती ही कमाई

असे सांगितले जात आहे की, ७९ वर्षांची ही महिला सकाळी १० वाजता रेल्वे स्टेशनला जाते आणि सायंकाळी ८ वाजेपर्यंत भीक मागते. असे करुन दररोज तिला दिवसाला ३०० युआन म्हणजेच ३१ हजार रुपये मिळतात. सोशल मीडियात आणि वृत्तपत्रांमध्ये तिच्या बातम्या आल्याने ती चांगलीच चर्चेत आहे. या महिलेवर टिकाही होत आहे. 

दरम्यान, अनेक लोकांचं हेही म्हणनं आहे की, कदाचित या महिलेला एकटेपणा जाणवत असेल, परिवार तिच्यासोबत वेळ घालवत नसेल, त्यामुळे ती भीक मागत असावी. तर या महिलेच्या मुलाने सांगितले की, प्रत्येकवेळी घराबाहेर जाताना आईला रोखणे शक्य होत नाही. कारण त्याला कामांसाठी किंवा ऑफिससाठी बाहेर जावं लागतं. 
 

Web Title: 79-Year-Old Beggar in China Ousted as Wealthy Grandma Who Just Enjoys Begging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.