सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज व्हायरल, शेवटची लाईन वाचून पोटधरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 02:53 PM2024-08-10T14:53:22+5:302024-08-10T15:42:39+5:30

Viral Photo : एका सातव्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलाचा सुट्टीचा अर्ज व्हायरल झाला आहे. जो वाचून लोक पोटधरून हसत आहेत. 

7th class student's leave application goes viral on social media | सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज व्हायरल, शेवटची लाईन वाचून पोटधरून हसाल

सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज व्हायरल, शेवटची लाईन वाचून पोटधरून हसाल

Viral Photo : बरीच मुले अशी असतात ज्यांना शाळेत जाणं खूप जास्त आवडतं. कारण त्यांना शाळेत जाऊन अभ्यास करणं, मित्रांना भेटणं आणि त्यांच्यासोबत खेळण्यात खूप मजा येते. पण काही मुलं अशी असतात ज्यांना शाळेत जाणं अजिबात आवडत नाही. सोशल मीडियावर नेहमीच शाळेतील मुलांच्या गमतीदार उत्तर पत्रिका किंवा कधी त्यांचे वेगवेगळ्या गोष्टींचे अर्ज व्हायरल होत असतात. असाच एका सातव्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलाचा सुट्टीचा अर्ज व्हायरल झाला आहे. जो वाचून लोक पोटधरून हसत आहेत. 

व्हायरल झालेल्या या अर्जामध्ये सातव्या वर्गातील एका मुलाने मुख्याध्यापिकेकडे सुट्टीची विनंती केली आहे. हा अर्ज सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. मुलाने अर्जात सगळ्यात आधी डिअर मॅडम असं लिहिलं आणि त्यानंतर थेट लिहिलं की, 'मी नाही येणार'. त्यानंतर त्याने पुन्हा दोन हेच लिहिलं आहे. शेवटी त्याने त्याची सही केली आणि तारीखही लिहिली आहे. 

सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा हा सुट्टी अर्ज सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. इन्स्टावर याला २८ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर ५.५ लोक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. तर ६.२ लाख यूजर्सनी ही पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नाही तर यूजर्स या पोस्टवर वेगवेगळ्या मजेदार कमेंट्सही करत आहेत. एक यूजरने लिहिलं की, 'जर मी येणारच नाही तर कशाचं टेंशन'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'बेटा ही घे तुझी टीसी आणि तू कधीच येऊ नको'. 
 

Web Title: 7th class student's leave application goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.